💥पुर्णा तालुक्यात वाहतेय पक्षांतराचे वारे : मन दुःखावलेले राजकीय पक्षी शोधताय नवीन सुरक्षित घरट्यांचे सहारे..!

 


💥राजकीय पक्षांतील आवक/जावक विविध राजकीय पक्षातील प्रस्थापितांसाठी ठरणार डोकेदुखी💥 

✍🏻राजकीय वार्तापत्र - चौधरी दिनेश

राजकीय पक्षांतील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून किंवा पक्षांतर्गत खदखदणाऱ्या गटबाजीत स्वतःच्या सातत्याने होणाऱ्या कुचंबनेला कंटाळून पक्षांतर करण्याच्या निर्णय घेणाऱ्यांच्या पदरात शेवटी पक्षांतराचा निर्णय घेतल्यानंतर ही निराशाच पडत असल्यामुळे सातत्याने पक्षांतर करण्याची वेळ का येत असते ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे कारण प्रत्येक पक्षात प्रस्थापित पुढारी ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास येत आहेत पक्षाला स्वतःची खाजगी संपत्ती समजून आपल्या शिवाय इतरांच्या पदरात काहीच पडू नयें या दृष्टीने वाटचाल करणाऱ्यांमुळे जिल्ह्यासह तालुक्यातही अनेक पक्षांमध्ये अंतर्गत असंतोष खदखदतांना दिसत असून पक्षांतराचे वारे आता हळुवारपणे वाहू लागलेले असून याची सुरूवात पुर्णा तालुक्यातील भाजप-शिवसेनेपासून झाल्याचे निदर्शनास येत असून 'तालुक्यात वाहतेय पक्षांतराचे जोरदार वारे : मन दुःखावलेले राजकीय पक्षी शोधताय नवीन सुरक्षित घरट्यांचे सहारे' अशी एकंदर परिस्थिती झाल्याचे दिसत आहे.


पुर्णा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अर्थात जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषदेच्या निवडणूका जश्याजश्या जवळ येत आहेत तसे तालुक्यात पक्षांतराचे जोरदार वारे वाहतांना दिसू लागले आहे मुळात राजकारणाची सुरूवात शिवसेना पक्षातून केलेले व शिवसेना पक्षात कार्यरत असतांना आपले कर्तृत्व आणि कार्यकुशलतेच्या बळावर शिवसेना पुर्णा तालुका प्रमुख यानंतर शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख यानंतर पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक अशी अनेक पद भुषवल्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले बालाजी देसाई यांनी भारतीय जनता पक्षातील प्रस्थापितांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह पक्षाच्या पदांचा राजीनामा देत पुन्हा स्वगृही शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय जाहिर करतात पुर्णा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली ग्रामीण भागातील राजकारणातला दबंग चेहरा म्हणून बालाजी देसाई यांच्याकडे बघितले जाते श्री देसाई यांची सहकार क्षेत्रावर अत्यंत मजबूत अशी पकड असून ते मागील पंधरा ते विस वर्षापासून पुर्णा कृषी उत्पन्न बाजारी समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चित्र बदललेले दिसेल व शिवसेना पक्षाला बळकटी मिळालेली दिसेल असे राजकीय जानकारांचे मत आहे. 


भारतीय जनता पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या बालाजी देसाई यांच्या घोषणे नंतर ग्रामीण भागातील युवकांमध्ये अल्पशः कालावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या व शिवशासन ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरूवात केलेले पुर्वाश्रमीचे शिवसैनिक सोमनाथ सोलव यांनी नुकताच काल गुरूवार दि.२१ आक्टोंबर २०२१ रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत परभणीत भाजपात प्रवेश केला असून ग्रामीण भागातील दबंग राजकारणी म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या बालाजी देसाई यांनी भाजपा सोडल्यानंतर त्यांच्या जागी भाजपाला सोमनाथ सोलव यांच्या रुपाने ग्रामीण भागात लोकप्रिय असलेला एक तरूण चेहरा मिळाल्याचे मत राजकीय जानकारांतून व्यक्त होत असून भाजपाने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीतील चुडावा जिल्हा परिषद सर्कल मधील संभाव्य भाजपा उमेदवार म्हणून सोलव यांच्या नावाची घोषणा ही केली आहे.

पुर्णा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अर्थात जिल्हा परिषद,पंचायत समिती,पुर्णा नगर परिषद निवडणूका अवघ्या काही महिण्यांवर येवून ठेपल्या असतांना शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांसह विविध राजकीय पक्षांतर्गत खदखदणारे अंतर्गत वाद निवडणूकांपुर्वी चव्हाट्यावर येण्याची शक्यता राजकीय जाणकारांतून वर्तवली जात असून या पक्षांतील एकाधिकारशाही व पक्षातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोरांना रोखने आता कद्दापी शक्य होणार नसल्याचे बोलले जात असून अनेक मातब्बर राजकारणी पक्षाला अखेरचा दंडवत करीत अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्यामुळे या पक्षांतील प्रस्थापित एकाधिकार शहांच्या तंबूत अक्षरशः खबराट निर्माण झाली असून आता आपल्या राजकीय भविष्याचे काय होणार ? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत असून राजकीय पक्षांतील आवक/जावक विविध राजकीय पक्षातील प्रस्थापितांसाठी आता भयंकर डोकेदुखी ठरणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या