💥पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल काय ? - माणिकराव सुर्यवंशी


💥युवासेना जिल्हाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांनी दिले जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निवेदन💥


💥गौर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांतील रस्त्यांचा प्रश्न गंभीर स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष💥  

पुर्णा (दि.०७ आक्टोंबर) - तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील गौर,निळा,महागाव,पिंपळगाव सोन्ना,टाकळी,सारंगी,आडगाव,कंठेश्वर,आजदापूर,सातेगाव,सारंगी आदी गावातील मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून देश स्वातंत्र्य होऊन तब्बल ७४ वर्षाचा कालावधी उलटत असतांनाही सादा ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असल्यामुळे ग्रामीण भागातील जनसामान्यांचे जिवन जगणे अवघड झाले आहे.


तालुक्यातील अनेक जागृत धार्मिक स्थळांनी सुशोभित गौर जिल्हा परिषद सर्कल मधील गौर,निळा,महागाव,पिंपळगाव सोन्ना,टाकळी,सारंगी,आडगाव,कंठेश्वर,आजदापूर,सातेगाव,सारंगी आदी गावातील प्रमुख रस्ते अत्यंत खडतर व प्रवासाअयोग्य झाल्याने या रस्त्यांचा गंभीर प्रश्न तात्काळ मार्गी लागून जिल्हा प्रशासनाने या गावांतील रस्त्याच्या दुरुस्तीच्या दृष्टीने तात्काळ पाऊल उचलावी याकरिता युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांनी आज गुरुवार दि.०७ आक्टोंबर २०२१ रोजी जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आंचय गोयल यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन गौर जिल्हा परिषद सर्कल मधील गौर,निळा,महागाव,पिंपळगाव सोन्ना,टाकळी,सारंगी,आडगाव,कंठेश्वर,आजदापूर,सातेगाव,सारंगी आदी गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाची मागणी केली आहे युवा सेना नेते माणिकराव सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की पुर्णा तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या दोन्ही गावांचे पुनर्वसन झाले असून त्यांना ताडकळस ते निळा-महागाव रस्ताच नाही सद्या दोन्ही गावातील गावकरी जिव मुठ्ठीत घेऊन प्रवास करीत आहेत तरी या गावाच्या रस्त्याचे काम युध्दपातळीवर झाले पाहिजे सदरील कामांना जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ मंजुरी देऊन काम करावे तसेच गौर-पिंपळगाव ते गंगाजीबापू-धनगर टाकळी-सारंगी-कंठेश्वर तसेच टाकळी रोड ते आडगाव-ताडकळस रोड ते कानखेड क्र.२ (शनिमंदिर) हे सुध्दा रस्ते तात्काळ दुरूस्त करून डांबरीकरण करण्यात यावे पुढे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः लक्ष घालून हे काम तात्काळ मार्गी लावावे अन्यथा युवा सेना स्टाईलने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्यपुर्ण नोंद घेण्यात यावी असेही युवा सेना उपजिल्हाध्यक्ष सुर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले असून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या मागणीची काय दखल घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या