💥राजस्थानी महिला मंडळाच्या उद्योजक महिला प्रदर्शन व विक्रीला प्रतिसाद....!


💥या कार्यक्रमात 50 महिला उद्योजकांनी आपापल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन घडवले💥

 गंगाखेड (प्रतिनिधी ) - राजस्थानी महिला मंडळातर्फे दिनांक 21 व 22 ऑक्टोबर रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील उद्योजक महिलांना त्यांच्या  कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उद्योजक महिला प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात 50 महिला उद्योजकांनी आपापल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन घडवले. त्यात हस्तनिर्मित खेळणी ,कपडे, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्वेलरी व इतर गृह उपयोगी साहित्य यांचे विविध स्टॉल द्वारे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. या कार्यक्रमास शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेमलता नावंदर व सरोज मानधना यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा तोष्णीवाल,सचिव वर्षा भुतडा, सहसचिव सारिका बंग,योगिता भंडारी, सहकोषाध्यक्ष शरयू धूत,कीर्ती बंग,सरस्वती बंग, मेघा दायमा यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या