💥बिड जिल्ह्यातील परळीत वैजनाथ येथे 3 अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर व 8 जिवंत काडतुसे जप्त...!


💥परळी शहर पोलिसांची धाडसी कार्यवाही ; मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जाते आहे💥

 बिड ; जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन पोसिसी खाक्या दाखवताच त्याने दिलेल्या  माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.पकडलेल्या आरोपीचे नाव रोहित राजेंद्र सोळंकी वय -25 वर्षे असे असून तो मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातत्या सेंदवा तालुका येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने, मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जाते आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून रात्री उशिरपर्यंतही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असून वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोचले आहेत. परळी शहर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, करण ऐन सनासुदिच्या दिवसांत पोलिसांवर कामाचा प्रचंड तणाव असतांना त्यांनी ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या