💥वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी 25 ऑक्टोबरपर्यंत माहिती दयावी....!


💥असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले💥 

@ फुलचंद भगत

वाशिम : राज्यात मागील काळात कोविड-19 चा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात झाला असल्याने वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवली होती, त्यामुळे राज्यस्तरावरुन तसेच केंद्रस्तरावरुन वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ नव्याने उपलब्ध होणेसाठी जिल्हयातील विविध हॉस्पीटलमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम 3.0 अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील कोविड योध्दांकरीता कस्टमाईज्ड क्रॅश कोर्सेसमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  

या योजनेतअंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचे माध्यमातून जिल्हयाकरीता एकूण 120 उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य प्राप्त झाले आहे. सदरचे प्रशिक्षण वाशिम जिल्हयातील नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थेत देण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हयातील इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांनी स्वत:ची माहिती https://bit.ly/3FXNKt1 या लिंकवर जावून Google Form मध्ये भरावी व त्या Form च्या खाली Submit बटनवर Click करावे.

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी स्वत:ची माहती Google Form मध्ये 25 ऑक्टोबरपर्यंत भरावी. सदर Google Form भरतेवेळेस काही तांत्रिक अडचण आल्यास 9850983335 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या