💥परळी शहरातील प्रभाग क्र.15 मधील रखडलेले कामे नगर परिषदेने तात्काळ पुर्ण करावे...!


💥भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गोविंद मोहेकर यांची मागणी💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील रखडलेले कामे नगर परिषदेने तात्काळ पुर्ण करावेत अन्यथा माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे युवा नेते गोविंद मोहेकर यांनी केले आहे. 


प्रभाग क्रमांक 15 मधील अनेक कामे रखडलेले आहेत. तसेच नागरी सुविधा कुठलीच मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ठिक ठिकाणचे रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले, मात्र फोडलेल्या रस्त्यावर नवीन रस्ते केले नाहीत. ज्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शनि मंदिर ते श्री गणेश मंदिर व श्री वैद्यनाथ मंदिराकडे ,जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न रखडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. इतर नागरी समस्ये वर लक्ष केंद्रित करून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, नाल्या खराब झाल्या आहेत. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच प्रभागामधील बरेचसे पथदिवे बंद आहेत. कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अन्यथा माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे युवा नेते गोविंद मोहेकर यांनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या