💥परभणी जिल्ह्यातील पालम शहरातील नवामोंढा परिसरात बोलेरो जिपचा काच फोडून ३ लाख ५० हजार रुपये लंपास..!


💥अज्ञात दोन चोरट्यांनी भरदुपारी ३-०० वाजेच्या सुमारास पळवले बोलोरोतील साडेतीन लाख रुपये💥

 परभणी ; जिल्ह्यातील पालम शहरातील नवामोंढा परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी बोलेरो गाडीतीला ३ लाख ५० हजार रुपयांची नगद रक्कम लंपास केल्याची घटना आज सोमवार दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी भर दुपारी ३-०० वाजण्याच्या सुमारास घडली.

 तालुक्यातील उमरा (काजी) येथील साहेब माधवराव उगले यांनी अर्थिक व्यवहार करण्यासाठी गंगाखेड येथून ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम आणली होती. पालम शहरात आल्यावर त्यांनी बोलेरो जीपचे दरवाजे बंद करून आतमध्ये रक्कम ठेवून ते कामानिमित्त गाडी पासून बाजूला गेले. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी जीपच्या काचा फोडून आतील रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये व शासकीय कामाची कागदपत्रे चोरून पोबरा केला. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद साने व पथक करीत आहेत. दरम्यान, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या