💥मागणी न करता मदत देण्याच औदार्य पंकजाताईं मुंडे यांच्या कडेच....!


💥खा.प्रितमताईंच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना💥

परळी/माजलगाव (दि.१५ सप्टेंबर) ; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी आणि माजलगाव तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.राज्यात पंकजाताईंचे सरकार असताना शेतकऱ्यांवर अनेकवेळा संकटाचे प्रसंग आले आणि प्रत्येक संकटात पंकजाताईंनी मागणी न करता मदत मिळवून दिली.संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना न मागता मदत मिळवून देण्याचे औदार्य केवळ पंकजाताईंकडेच आहे" अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.


सलग दुसऱ्या दिवशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी करताना खा.प्रितमताई मुंडे यांनी परळी तालुक्यातील ममदापूर,बोरखेड, तेलसमुख,रामेवाडी, कासारवाडी, पोहणेर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली.तसेच नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.


परळी तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की शेतकऱ्यांना मदत करण्याची आस्था राज्यातील सरकारमध्ये दिसत नाही.राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आमचे सरकार घेत असे, परंतु महाविकास आघाडी सरकारकडे या भूमिकेचा अभाव दिसत आहे.या संकटाचा सामना करत असताना तुम्ही विश्वास गमावू नये म्हणून मी आले असल्याचे त्यांनी सांगितले.

💥खा.प्रितमताईंनी प्रशासनाला खडसावले ; समन्वयाने काम करण्याच्या दिल्या सूचना ;-


अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे,शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरसकट नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे.परंतु प्रशासन पंचनामे करण्याच्या भूमिकेत आहे.जर पंचनामे करत असाल तर समन्वयाने काम करा,कालबद्ध कार्यक्रम राबवून वेळेत पंचनामे पूर्ण करा.महसूल विभाग,कृषी आणि विमा कंपनीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे.सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बांधावर जाऊन पंचनामे करावेत,समन्वयाअभावी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामे नये' अशा शब्दात खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाला खडसावले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या