💥औरंगाबाद येथील शेख महाराजांनी चालू किर्तनात धुळे जिल्ह्यातील जामदे गावी आपला देह ठेवला...!


💥काल सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी रात्रीची घटना💥

 'दु:खद वार्ता'

औरंगाबाद (दि.२८ सप्टेंबर) येथील वारकरी सांप्रदायातील एक क्रांतिकारी कीर्तनकार श्री ह.भ.प ताजोद्दीन बाबा यांना काल सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री नंदुरबार मधे चालू कीर्तनात हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघे ४५ मिनिट किर्तन केले आणि चालू कीर्तनात सर्व घडले.

असे भाग्य फार थोड्यांच्या नशिबी येते आणि याचाच अर्थ त्यांची आजवरची सेवा भगवंत चरणी रुजू झाली असे सांप्रदायात मानण्यात येते महाराजांचे कार्य खुप मोठे आहे.धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने कार्य केले...

अशा महान व्यक्तिमत्त्वाला ईश्वर चरणी जागा मिळो...वै श्री.ह.भ.प. ताजोद्दीन बाबांना भावपूर्ण  आदरांजली.🙏🏻🙏🏻🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या