💥यशवंत मुंडेंच्या यशाने परळीची मान देशात उंचावली....!


💥पंकजाताई मुंडे यांनी केला युपीएससी टाॅपरचा गौरव💥

परळी (दि.२७ सप्टेंबर) - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या बहादूरवाडीच्या यशवंत अभिमान मुंडे यांच्या दैदीप्यमान यशाने परळीची मान देशात अभिमानाने उंचावली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी यशवंत यांचा गौरव केला.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन देशपातळीवर 502 वी रँक मिळवल्याबद्दल आज यशवंत अभिमन्यू मुंडे यांचा यश:श्री निवासस्थानी पंकजाताई मुंडे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यशवंत मुंडे यांच्या कौतुकास्पद यशाने परळीची मान अभिमानाने उंचावली आहे,यूपीएससी परीक्षेत परळीच्या भूमीपुत्राने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी यशवंतचे आई-वडिल व नातेवाईक उपस्थित होते.

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या