💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मधील डिघोळ तांडा बलात्कार व आत्महत्या प्रकरणात तिन पैकी एक आरोपी ताब्यात...!


💥दोन आरोपींचा शोध सुरू ; घटनेतील आरोपीं विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल💥

परभणी ; जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याने या घटनेने भेदरलेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यात सोनपेठसह जिल्हा हादरला असून पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी सोनपेठ पोलीस स्थानकास भेट दिली असून घटनेचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,डिघोळ तांडा येथील तरुणी सोनपेठच्या महालिंगेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेते डिघोळ येथील एक तरुण तिची मागील दोन वर्षांपासून छेड काढत असल्याने पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यास समजावून सांगितले होते.मात्र भावनांचे भूत अंगात शिरलेल्या तरुणाने आणखी दोघांना सोबत घेऊन मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन आरोपींनी एकत्र येऊन पीडितेवर बलात्कार केला घटनेने भेदरलेल्या तरुणींने आपली समाजात नाचक्की होऊन बदनाम होतोल या भीतीने विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तीला लातूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सद्या स्थितीत तिची मृत्यूशी झुंज चालू असून घटनेनंतर सोनपेठ पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.भादवी२२१/२०२१ कलम ३७६(ड),३५४(ड)३४ भादवी सह कलम ३,६,८,१७ सह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सोनपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने,पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी,पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस करत आहेत.दरम्यान दिवसेंदिवस घडणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे महीला,मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा धाक नसल्याने अशा घटना घडत असून अशा आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

*आरोपींना कठोर शिक्षा द्यावी*

झालेली घटना अत्यंत गंभीर असून या घटनेनंतर महाराष्ट्रात भेदरक वातावरण निर्माण झाले आहे.सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेच्या तपासअधिकारी असणाऱ्यांचे राजकिय लोकांशी संबध असल्याने आरोपींना कठोर शासन होईल का?असा सवाल उपस्थित करत तपासअधिकारी बदलून सद्या असणाऱ्या तपासअधिकाऱ्यांचे फोन कॉल तपशील तपासून यात दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माननीय श्री वैजनाथ जाधव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंजारा मजदुर संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या