💥पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे कृषी कन्या शितल मोरे कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन....!


💥तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी व कृषीविषयक विविध मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती दिली💥

पुर्णा/प्रतिनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, परभणी येथील कृषी कन्या शितल एकनाथ मोरे हीने ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकऱ्यांना दि.२८ सप्टेंबर रोजी ई-पीक पाहणी व कृषीविषयक विविध मोबाईल ॲप्लिकेशन बाबत सविस्तर माहिती देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिक करून दाखवत कृषी माहिती विषयक मोबाईल अॅप हाताळताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी चे शंकानिरसन केले. यावेळी आहेरवाडी येथील  पं. स. सदस्य छगनराव मोरे, शेतकरी विक्रमराव मोरे, भाऊराव मोरे, जनार्धन मोरे, राजू लिंगायत, एकनाथ मोरे, बालाजी मोरे पोलिस पाटील आदी सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी शितल मोरे यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कार्यक्रम अधिकारी डॉ.ए. डब्लू. मोरे, डॉ.पी.एम.कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या