💥रावराजूर येथील मौल्यवान ठिकाण, रावराजूरचे "हवामान केंद्र".....!


💥रावराजूरमध्ये यंत्रणाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे💥

मंडळस्तरावरील हवामान केंद्र ही आजच्या तारखेतील शेतकऱ्यांसाठी सर्वातमौल्यवान यंत्रणा आहे हवामानाचा अंदाज वर्तवणारी ही यंत्रणा कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अतिवृष्टी अशा गोष्टी निश्चित करण्यात व त्यानंतर शासकीय मदत व पिकवीमा मिळवण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावते.

           रावराजूरमध्ये मात्र ही यंत्रणाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोनवेळा येथील गेट काढून नेण्यात आले आहे. पर्जन्यमापकावर दगड मारण्यात आले. सोलर प्लेट काढून घेण्याचाही प्रयत्न झाला. ही सोलर प्लेट काढल्यास कोणत्याही नोंदी होणार नाहीत व कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही हे लक्षात घ्या.

           तेव्हा हा प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर लक्ष ठेवावे व त्याच्यावर गुन्हे दाखल करावे ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून ठोस निर्णय घ्यावा हवामान केंद्राचे नुकसान म्हणजे केवळ रावराजूरचे नव्हे तर मंडळातील सर्व गावांचे नुकसान आहे. ही बाब लक्षात घ्या व सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.

हेमचंद्र शिंदे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या