💥पुर्णा तालुक्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार मावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान...!


💥पुर्णा-गोदावरी नद्यांसह नाले ओढे ओसंबडून वाहू लागल्यामुळे जनजिवन अस्तव्यस्त💥

 पूर्णा (दि.२९ सप्टेंबर)  ; तालुक्यात सर्वत्र मुसळधार जोरदार पडलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून पुर्णा-गोदावरी नद्यांसह नाले ओढे ओसंबडून वाहू लागल्यामुळे जनजिवन अस्तव्यस्त झाले होते तालुक्यातील आहेरवाडी, कानेगाव ,फुकटगाव,झीरो फाटा ,पूर्णा नांदेड रस्ते बंद झाल्याने एकुण सहा गावाचा संपर्क तुटला होता पूर्णा बाजारपेठकडे ग्रामीण भागाकडुन येणारे रस्ते बंद असल्याने बाजारात सर्वत्र सुकसूकाट होता.


तालुक्यात चोविसतासात ५६ मि.मी.पाऊस पडला तर आतापर्यंत ११३३ मि.मी.एवढा पाऊस पडला आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसाने कापणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकास अक्षरशः मोड फुटत असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे पूर्णा - नांदेड मार्ग चुडावा जवळील नदीला पाणी आल्याने नविन फुल बांधकाम होवुनही पाणी रोडवरुन वाहत होते परीणामी रस्ता बंद होता . आहेरवाडी , कानेगाव ,फुकटगाव तीन  गावाचा संपर्क तुटला . माटेगाव पुलावरुन पाणी दिवसभर वाहत होते म्हणून पूर्णा झिरोफाटा रस्ता सायंकाळपर्यंत बंद होता . पावस सतत पडत असल्याने सर्व नद्याना पाणी कमी ना होता सातत्याने वाढत आहे .

💥तालुक्यातील नागरीकांनी घराबाहेर पडतांना आपल्या कामाची गरज पाहूनच बाहेर पडावे - पल्लवी टेमकर तहसीलदार ,पूर्णा

        तालुक्यातील नागरीकांनी घराबाहेर पडतांना आपल्या कामाची गरज पाहूनच बाहेर पडावे कारण सर्व धरणे, तलाव भरले आहेत सतत पाउस पडत आहे .म्हणून नदी ,ओढा , मोठे नाले अदी काठावर आखाडे असतील तर काळजी घ्यावे असे आवाहन केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या