💥माजलगांवकर महाराजांच्या निधनाने समाज एका महान तपस्वीला मुकला...!


💥पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली💥

बीड (दि.१० सप्टेंबर) - माजलगाव येथील सदगुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी माजलगावकर महाराज यांच्या निधनाने समाज एका महान तपस्वीला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.


माजलगावकर महाराजांचा वीरशैव समाजाच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा मोठा शिष्य वर्ग आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ते सिध्दयोगी तपस्वी होते, त्यांच्या निधनाने  समाजातील जाती धर्माचे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या