💥परभणी शहरातील माणुसकीचा अनमोल दागिना 'आदरणीय देवा पाटील' यांचा ३५ वा वाढदिवस...!


💥दिलेल्या शब्दाला जागणारा 'निर्मळ हृदयाचा मित्र' सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सतत कार्यरत राहणारा जनसामान्याचा 'नायक'💥

✍🏻चौधरी दिनेश (रणजीत) / प्रेमकुमार पोरवाल✍🏻

" यश आणि अपयश मानवी जीवनातील महाभारताच्या युद्ध रथाची दोन चाके आहेत....परिस्थितीबाबत काळ  हे कोणत्या दिशेने जाणार आहे .हे ज्यांना कळते त्यांना आपण जाणकार पुरुष असे म्हणतो अशा जाणकारांचा आदर विरोधकही करतात आदरणीय देवा पाटील म्हणजे जनता किंवा समाजाच्या हितासाठी आग्या मोहळावरही बिनधास्त हात टाकणारा नेता जगण्याचा हिशोब म्हणणारी माणसं या जगामध्ये खूप भेटतील परंतु कस जगल पाहिजे याचा हिशोब मांडणारे आदरणीय देवा पाटील सारखी जाणकार नेते मंडळी आता खूप कमी झाली आहे.


" देवाने याने त्याला अगदी सर्वांग सुंदर असे स्वरूप आणि रूप दिले आहे. आणि त्यातच भर म्हणजे जनसेवेचा जन्मजात स्वभाव दिला आहे. त्यालाच आपण सोने पे सुहागा असे म्हणतो म्हणून त्यांना मी अनमोल दागिना असे म्हणतो कार्यकर्त्यांना,मित्रांना,लोकांना,मोठा करत असताना या माणसाला मनस्वी आनंद होतो. आदरणीय देवा पाटील यांची जेवढी भक्ती देवावर आहे तेवढीच जनतेवर आहे. देवामध्ये जनता आणि जनतेमध्ये देव पाहणारा हा जाणता नेता दीर्घायू व्हावा अशी आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन मागणी करतो.


मी आपल्याला तीस-पस्तीस वर्षात पासून पाहत आलो आपल्यामध्ये तसूभरही काही फरक पडल्याचे जाणवत नाही. आपणास न भेटताही आपल्या जवळ असल्याचा भास होतो किंवा आपण कालच भेटल्यासारखे वाटते तितके मैत्रीपूर्ण प्रेम आपण आमच्यासारख्या सामान्य मित्र परिवाराला दिले त्याबद्दल धन्यवाद.

 आदरणीय दादाश्री सत्ता येते आणि जाते. आपण सत्तेची लढाई लढता लढता नैतिकतेच्या चौकटीत राहून सत्याची लढाई लढता केवळ अद्भुत आणि अद्वितीय ,अविस्मरणीय,  पराजयाच्या काळोखातून एक दिवस अभूतपूर्व  विजयाचा जन्म होतो तुम्ही सत्ता वापरली ती जनतेच्या हितासाठी. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या हितासाठी आपली दौलत शिल्लक राहील की नाही याचे मोजमाप तुम्ही कधी केले नाही.

 आपला कार्यकर्ता ,आपला सवंगडी ,आपला  मित्रपरिवार, आपला मतदार हीच आपली दौलत असे समजणारा अष्टपैलू, अवलियाने  नेता. आज कार्यकर्ते तुमचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचा उत्साह पाहून तुमचे संघटनात्मक कार्य अजूनही मजबूतपणे चालू असल्याची चुणूक लक्षात येते....जिल्हा मराठवाडा ,राज्य व देशाला पूर्वीपेक्षाही भविष्यामध्ये जास्त गरज आहे. आपल्या आध्यात्मिक मार्गातून आपल्या लक्षातच येत असावे की जनतेच्या मनामध्ये काय चालू आहे. जनतेच्या मनातील भावना व त्यांच्या नाडीचे ठोके करणारा नेता अशी आपली ख्याती ही भविष्यात अधिकच उजळ होणार असून एक दिवस आपण आपल्या मतदारसंघाचे नाहीतर मराठवाड्याचे नाव काढा आणि इतके मोठे व्हाल. मी काही भविष्यकार नाही परंतु भविष्यात जे घडणार आहे त्याचा एक अंदाजा राजकीय विश्लेषक म्हणून बांधू शकतो. तसेच आपल्या मध्ये असलेली प्रचंड ऊर्जा आम्ही ओळखून आहोत. साहेब तुमच्या मधली जिद्द अभूतपूर्व आहे."


हम होंगे कामयाब एक दिन जरूर..... भविष्यातील प्रचंड विजयश्रीच्या शुभेच्छा आपल्या वाढदिवसाच्या शुभ दिनी देतो आपणास आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो हिच तुळजा भवानी मातेच्या चरणी आम्ही सर्व मित्र परिवारासह शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र व जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवाराचे वतीने करतो.....आपणास वाढदिवसाच्या मनपुर्वक शतशः हार्दिक शुभेच्छा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या