💥अखेर तो वाहुन गेलेला मृतदेह शोधन्यात बचाव पथकाला यश...!


💥वडगाव परीसरातील अडाण नदीकाठी गुरे चारणाऱ्या इसमाला झुडपात अडकलेल्या अवस्थेत दिसला मृतदेह💥

वाशिम :-गेल्या तीन दिवस आधी मंगरुळपीर तालुक्यातील खरबी शिवारातुन अडाणनदीत वाहुन गेलेल्या महादेव खाडे यांचा मृतदेह दि.२४ सप्टेबर ला कारंजा तालुक्यातील वडगाव परीसरातील अडाण नदीकाठी गुरे चारणा-या इसमाला झुडपात अडकलेल्या अवस्थेत आज दुपारी दिसुन आल्याची माहिती पथकाला देण्यात आली. 


                 यावेळी अडाण नदीपात्रात सर्च ऑपरेशन चालु असलेल्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला माहीती देण्यात आली आणी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पथकाच्या जवानांनी वडगाव येथे पोहचुन पुलाजवळील धारेत मृतदेह पकडला.तीन दीवसा पासुनच्या सर्च ऑपरेशन ला पुर्ण विराम मिळाला.यावेळी वडगाव येथील एक वयोवृद्ध इसम वाहुन जात असताना नदीच्या पात्रातील पुरामुळे धारेतुन पाईप मध्ये घुसण्याच्या आधीच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी मोठे धाडस करुन वाचविले. कारण अशावेळी इंटर्नल फ्लोमधे माणसाला  आत ओढण्याचा धोका असतो. मसोला बु.ता. मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील रहिवासी मानिक महादेव खाडे वय अं.(70) हे खरबी शिवारात बैल चारत असतांना अडाणनदीत वाहुन गेल्याची माहिती तहसीलदार नरसय्या कोंडागुरले आणी ठाणेदार जगदाळे  यांनी जिवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले होते.मंगरूळपीरचे तहसीलदार नरसय्या कोंडागुरले यांच्या आदेशाने व मं.पो.स्टे.चे जगदाळे यांच्या सहकार्याने व पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला शाखा मंगरूळपीर चे स्वयंसेवक अतुल उमाळे,गोपाल गीरे, संतोष मांडवगडे,गोपाल जयस्वाल,दत्ता मानेकर मयुर सळेदार,कीशोर तायडे,मयुर कळसकार, गोविंदा ढोके हे सर्च ऑपरेशन राबवित होते. बरेच ठीकाणी बंधारे आणी आत लोखंडी बार असलेल्या ठीकाणी शोध कार्यात अडचणी येत होत्या नदीला पुर वाढल्याने मृतदेह समोर जाण्याची शक्यता होती यामुळे आज साखळी पद्धतीने सर्च ऑपरेशन राबवित असतांना आज दुपारी कारंजा तालुक्यातील वडगाव शिवारातील अडाण नदीच्या काठावर गुरे चारणा-याला मानिक खाडे यांचा मृतदेह दिसुन आला.यावेळी लगेचच पथकाची टीम वडगावकडे रवाना होऊन घटनास्थळी पोहचले. तेव्हा एक इसम मृतदेह ओढत आणतांना त्यांच्या हातुन  मृतदेह निसटला आणी हा इसम धारेत लागुन पाईपामधे जाताच लगेच  पथकाच्या रेस्क्यु टीमने पाईपमधे जात असतांना लगेच बाहेर काढले आणी वाचविले आणी पुन्हा वाहत जात असलेला मृतदेह पुलाजवळ संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी पकडला. यावेळी नातेवाईक समाधान भगत आणी वडगाव येथील नागरिकांनी सहकार्य केले. घटनास्थळी कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशन चे एएसआय.धिसले, पो.काॅ. तुषार भोयर, पो.काॅ. कोकणे,कैलास गवई,हे हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.या बचाव कार्यामध्ये वनोजा येथील आपत्ती व बचाव पथकानेही सहकार्य केले होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या