💥वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी व कौतुकास्पद कारवाई....!


💥बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलेल्या इसमाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस ; 3 आरोपी गजाआड💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-(दि.१७ सप्टेंबर) - बंदुकीच्या गोळ्या झाडून एका 32 वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे गावानजीकच्या शेतात 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.मालेगाव पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 12 तासांत मृतकाची ओळख पटविण्यात यश मिळविले होते.

                 नागपूर इथल्या थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, साईबाबा नगर खरबी हनुमान नगर माधव यशवंत पवार, गोळीबार प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस चमू गठित केला होते अखेर तीन आरोपींना नागपूर पोलीस व वाशिम पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.तर तीन आरोपीचा शोध सुरू आहे.अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय चव्हाण,उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे,स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक एस एम जाधव,व मालेगाव पोलीस निरीक्षक डी एम धुमाळ उपस्थित होते, सविस्तर महिती अशी की,या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निशिद वासनिक याचे कडे Ether trade asia चे बिट कॉईन चे व्यवसायात लोकांनी गुंतावणूक करावी म्हणून मृतक हा सेमिनार आयोजित करीत होता. तसेच व्यवसायचा हिशोब ठेवीत होता. व्यवसायचे बिटकॉईन चे पैशाची हरफेर व पाहिजे असलेल्या मोबाईल चे वादातून आरोपीनी मृताकाचे नागपूर येथून घरून आपहरण करून त्याला वाशीम येथे रोडचे बाजूला निर्जन स्थळी उतरावून त्याला विचारपूस करून निषेद वासनिक याने गोळ्या झाडून मृताकाचा खून केला असल्याच पोलीस तपासातून समोर आलं आहे.ताब्यात घेतलेले आरोपी विक्की उर्फ विकल्प विनोदराव मोहोड, आराधना नगर, खरबी, पोस्टे वाठोडा (मुख्य आरोपी), शुभम उर्फ लाला भीमरावजी कन्हारकार वय 22, रा. आराधना नगर, नागपूर, व्यकेश उर्फ टोनी मिसन भगत,वय 25 रा. आराधना नगर, नागपूर. अजून मुख्य आरोपीसह दोन आरोपीचा शोध सुरू असून त्यामध्ये निशिद महादेव वासनिक, (मुख्य आरोपी) रा. आराधना नगर, नागपूर., गज्जू उर्फ गजानन मुनगुने. तर एक अनोळखी महिला आहे.ताब्यातील 3 आरोपीना पुढील कार्यवाही करीता वाशीम पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करणार आहेत.वाशिम पोलिसांनी तपासकार्यात पुन्हा एकदा 'द'ग्रेट कामगीरी केल्याने पोलीस दलाचे कौतुक होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या