💥राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर खंडपीठासमोरच सुनावणी....!


💥आतापर्यंत बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे💥 

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ई.डी.) बजावलेल्या समन्सविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या याचिकांची सुनावणी एकलपीठ नव्हे तर खंडपीठासमोरच व्हायला हवी असा निर्वाळा मे.उच्च न्यायालयाने  दिला तसेच देशमुख यांची याचिका योग्य त्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी सादर करण्याचे आदेशही मे.न्यायालयाने निबंधक कार्यालयाला दिले ई.डी.ने सुरू केलेली कारवाई तसेच आतापर्यंत बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे.

परंतु याचिकेतील मुद्याचे स्वरूप लक्षात घेता याचिका एकलपीठाऐवजी खंडपीठाकडे सुनावणीसाठी यायला हवी अशी नोंद मे.उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाने नोंदवली होती हा आक्षेप योग्य असल्याचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी याप्रकरणी निर्णय देताना स्पष्ट केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या