💥स्वतःच्या रक्ताचे अक्षरशः पाणी करून अन्नदाता शेतकरी राजा माझा मातीतून धान्य पिकवीतो...✍🏻


💥भामट्या सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून मृत्यूला कवटाळत शेवटी स्वतःच अस्तित्व संपवीतो💥

✍🏻 कविता - चौधरी दिनेश (रणजीत)

स्वतःच्या रक्ताचे अक्षरशः पाणी करून

अन्नदाता शेतकरी राजा माझा मातीतून

 धान्य पिकवीतो स्वतःच्या कुटुंबाची हाल

 अपेष्ठा करून मनुष्यरूपी बेईमान 

कोल्ही कुत्री ही जगवतो...!

स्वतः राबराब राबतो उन पाऊस हिवात

अन् स्वतः कांदा भाकरी खाऊन 

धनदांडग्या चोरांच्या मुखात मात्र 

मोत्याचा घास भरवीतो...!!

अन्नदाता माझा शेतकरी राजा 

काबाड कष्ट करून समद जग 

जगवीतो अन् स्वतः मात्र सततची नापिकी 

अन् भामट्या सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली

 गुदमरून मृत्यूला कवटाळत शेवटी 

स्वतःच अस्तित्व संपवीतो....स्वतःच अस्तित्व संपवीतो... 

[साहित्य क्षेत्र ;- कविता - चौधरी दिनेश (रणजीत)]


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या