💥भारतीय तंत्रज्ञान कंपनी 'इन्फोसिस’ची नक्षलवादी,देशद्रोह्यांना मदत ? संघ समर्थक ‘पांचजन्य’ मधील आरोप....!


💥इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत💥

संघ समर्थक ‘पांचजन्य’ मधील आरोप इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना ? अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली आहे ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले आहे. 


वस्तू व सेवाकर (जी.एस.टीक) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो असा आरोप  पांचजन्यच्या ताज्या अंकात केला आहे ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. 

उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे ‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे जी.एस.टी. आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या