💥जोरदार पावसाने उडवली शेतकऱ्याची झोप, काढणीला आलेले सोयाबीन भिजते पाण्यात....!


💥 तीन दिवसांपासून पावसाचाहाहाकार,सोयाबीन,कापूस,फळबागांचे अतोनात नुकसान💥

पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात दि.२६ सप्टेंबर पासून सलग तीन दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह  पावसाने हजेरी लावली असून दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वातावरणात बदल होत  जवळपास एक तास मुसळधार पाऊस होत रात्रभर पाऊस चालू राहिला यामुळे परिसरातील शेत शिवाराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते.खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन पीक चांगले हातात पडेल व आपले आर्थिक नियोजन लागेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अत्तिवृष्टीन यावर पाणी फेरले असून शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी  तसेच पीक विमा नुकसान भरपाई कोणत्याही अटी वीणा लागू करून १००% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
 


                 परिसरातील नद्या सह छोटे मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत .दिग्रस बंधाऱ्यात माजलगाव धरणातील पाणी तसेच परिसरातील ओढयांचे पाणी गोदावरीत दाखल झाल्याने  दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे  उघडले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात विष्णुपुरी प्रकल्पात होत आहे. सद्यस्थितीत सोयाबीन,कापूस,तुर व फळ बागांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात उभे असलेले काढणीला आलेले सोयाबीन पिकाचे शेंगा जोरदार पावसाने नासून जात आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेंगांना अंकुर फुटून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.  त्या सोबतच शेतकऱ्याचे नगदी पीक असलेले कापूस पिकाला चांगल्या प्रकारे बोंड लगडलेली होती परंतु सततच्या जोरदार पावसाने  कापसाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.सोयाबीन पीक काढणीला आले असतानाच  पावसाच्या जोरदार फटक्यामुळे हता तोंडाशी आलेले पीक शेतकऱ्याच्या हातून गेल्यामुळे परिसरातील मुंबर, गोळेगाव,धानोरा काळे, बानेगाव,कळगाव, ताडकळस,देऊळगाव, देवठणा येथील शेतकरी हवालदिल झाले असून  दि.७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी ची प्रशासनाने  नुकसानीची पाहणी केली आहे परंतु दोन वेळेस आतीवृष्टी होऊनही आणखीन प्रशासनाकडून पंचनामे झाले नाहीत की आर्थिक मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्तत्काळ सर सगट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी  तसेच पीक विमा नुकसान भरपाई कोणत्याही अटी वीणा 100% लागू करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.  


प्रतिक्रिया...

१) धानोरा काळे शिवारात ७ सप्टेंबर रोजी जोरदार आत्तिवृष्टी झाली यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी तहसीलदार,जिल्हाधिकारी,पालकमंत्री यांनी पाहणी केली ,त्यातच गेल्या दोन दिवसापासून  जोरदार पावसाने काढणीला आलेले शिलक राहिलेले सोयाबीन पीक पूर्ण गेले असून खूप मोठे नुकसान झाले यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. 

जनक काळे, शेतकरी,धानोरा काळे,ता.पूर्णा

२) लिमला मंडळात दोन वेळेस जोरदार अतिवृष्टी झाली ,यात काढणीला आलेले सोयाबीन, कापूस,फळबाग ,भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले परंतु अद्याप महसूल यंत्रणेकडून सर सगट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत त्यातच येथील पर्जण्यमापक यंत्र अद्यावत नसल्याने व यावर प्रशासनाचा वचक नसल्याने खरी नोंद होत नाही यामुळे अत्तीवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे .

पांडुरंग शिंदे,प्रयोगशील शेतकरी लिमला ता.पूर्णा जी. परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या