💥शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करणारे पंजाब डंख यांना शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सम्मानित करावे -- सचिन बोन्द्रे


💥बोन्द्रे यांनी चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यामार्फत  सादर केलेल्या निवेदनाद्वारे शासनाकडे केली मागणी💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली : गेल्या जवळ जवळ दशकभरापासून शेतकऱ्यांना विनामूल्य हवामान अंदाज सांगून सोशल मीडियाद्वारे/प्रत्यक्ष तथा प्रिंट मीडियाने मार्गदर्शन करणारे, मराठवाड्याचे सुपुत्र शेती साठी अभ्यासिक योगदान देणारे श्री.पंजाबराव डंख यांना शासनाने त्यांच्या कार्यासाठी "महाराष्ट्रभूषण" पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी चिखलीचे माजी नगरसेवक कृषिमित्र सचिन बोन्द्रे यांनी चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यामार्फत  सादर केलेल्या  निवेदनाद्वारे  शासनाकडे केली आहे.

शेतकऱ्यांना/सामान्य नागरिकांना आपल्या सोशल मीडियातील व्हिडिओच्या आणि नागरिकांत प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे म्हणुन संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये   कृषिमित्र असलेले माजी नगरसेवक सचिन बोन्द्रे हे प्रसिद्ध आहेत सचिन बोन्द्रे यांनी पंजाबराव डंख यांच्या शेतकऱ्यां प्रतिच्या जिव्हाळ्याला महत्व देऊन आपल्या फेसबुकला व्हिडिओ शेयर केला. सामान्य जनतेने मोठया प्रमाणात या व्हिडिओला पसंती देऊन सचिन बोन्द्रे यांच्या कार्याला नेहमीप्रमाणे पाठिंबा दर्शविला.

आज सचिन बोन्द्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी, व वारकरी बांधवांसह शेती आणि मातीसाठी कार्य करणारे पंजाबराव डंख यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करावे ही आपली मागणी एका निवेदनाद्वारे शासनाकडे चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे चिखली  यांच्यामार्फत निवेदन  देऊन शासनाकडे मागणी केली आहे सचिन बोन्द्रे यांच्या या कृतीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच निवेदनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुद्धा या वेळी दिसला हे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब, मा.खा.शरदचंद्रजी पवार तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री बुलढाणा मा.ना.राजेंद्रजी शिंगणे, तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सादर करण्यात आले.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते कृषिमित्र सचिन बोन्द्रे सह चिखली तालुका काॅग्रेस  किसान सेलचे अध्यक्ष समाधान गिते, माजी सभापती डाॅ. सत्येंद्र भुसारी,बाजार समितीचे प्रशासक गजानन परिहार, युवक काॅगे्सचे बाळु साळोक, अॅड. प्रशांत देशमुख,बाळु लहाने, आजाबराव इंगळे, लक्ष्मण भिसे, राजेंद्र लहाने, समाधान आकाळ, परमेश्वर साळवे, संतोष थोरात, अमोल सुरडकर, बाजीराव उन्हाळे, शेख जाकीर भाई, सुभाष खरात, सतिश जगताप, बळीराम हाडे, दत्ता करवंदे, ज्ञानेश्वर इंगळे, गणेश ठेंग, गजानन जाधव, साहेबराव आंभोरे, सतिश जगताप, यांच्या स्वाक्षरी आहेत...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या