💥भोरसा भोरसी ग्रामसेवा सहकारी संस्थेद्वारा महत्वपूर्ण ठराव मंजूर....!


💥जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून कृष्णा मुरकुटे यांच्या नावावर एकमत💥

✍️  मोहन चौकेकर

भोरसा भोरसी : सप्टेंबर रोजी भोरसा भोरसी ग्रामपंचायत भवन येथे ग्रामसेवा सहकारी संस्थेद्वारा महत्वपूर्ण ठरवा सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

भोरसा भोरसी ग्रामसेवा सहकारी संस्थेत एकूण १२ सभासद असून त्यापैकी एक सभासद मयत असल्याने ११ सदस्यांनी एकत्रित येत बैठकी दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री शिंगणे साहेब यांचे निकटवर्तीय कृष्णा मुरकुटे व बद्रीनाथ भुसारी यांचे नावे सुचविले असता बहुमताचे झुकत माफ असल्याने बद्री भुसारी यांनी माघार घेतली असता कृष्णा मुरकुटे यांच्या नावावर एकमत होऊन सदर ठराव त्यांच्या नावे मंजूर करण्यात आला त्यांना सूचक म्हणून जगन्नाथ आष्टीकर तर अनुमोदन म्हणून गजानन भुसारी हे होते,शेतकी खरेदी विक्री संस्थे साठी गजानन तुकाराम भुसारी व सौ. संगीता सतेंद्र भुसारी यांच्यापैकी सौ भुसारी यांनी माघार घेतली असता गजानन भुसारी यांच्या नावे सदर ठराव मंजूर करण्यात आला, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेसाठी प्रशांत ढोरे पाटील व एन टी भुसारी यांच्या पैकी भुसारी यांनी माघार घेतल्यामुळे प्रशांत पाटील यांच्या नावे सदर ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सूचक म्हणून कृष्णा मुरकुटे व आनुमोदक म्हणून जगन्नाथ आष्टीकर हे होते,तालुका देखरेख सहकारी संस्थेसाठी सौ.कमल बाई प्रताप ढोरे यांच्या नावे बिनविरोध ठराव मंजूर करण्यात आला यांना सूचक म्हणून प्रशांत ढोरे पाटील तर अनुमोदक म्हणून डॉ सतेंद्र भुसारी होते,बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स करिता जगन्नाथ आष्टीकर यांच्या नावे बिनविरोध ठराव मंजूर करण्यात आला, जि. देखरेख संस्थेवर शेख नाशिर शेख हसीम यांच्या नावे ठराव मंजूर करण्यात आला यांना सूचक म्हणून प्रशांत ढोरे पाटील तर आनुमोदक म्हणून डॉ सतेंद्र भुसारी होते,जिल्हा कृषि औधोगीक सह संस्थेसाठी एन टी भुसारी व अशोक गवई यांच्या मधून गवई यांनी माघार घेतल्यामुळे भुसारी यांच्या नावे ठराव मंजूर करण्यात आला यांना सूचक म्हणून डॉ.सतेंद्र भुसारी तर आनुमोदक म्हणून प्रशांत ढोरे पाटील हे होते,सदर प्रक्रियेत सहा, पाच असे असल्यामुळे  आपसात वाद न करता सामंजास्याची भूमिका घेत बाजार समितीचे माजी सभापती तथा कॉग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉ.सतेंद्र भुसारी व सौ. संगीता सतेंद्र भुसारी हे दोघे ही पतिपत्नी सभासद असतांना देखील त्यांनी व ग्रा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बद्री भुसारी यांनी औदार्य दाखवून सदर ठराव अविरोध मंजुरीसाठी मोलाचं सहकार्य केले,

या दरम्यान काही काळासाठी राजकीय दडपणापोटी काही सभासदांची तणावग्रस्त स्थिती निर्माण झाल्याची छटा साफ चेहऱ्यावर दिसत होती ,तरी देखील राजकीय हेवे दावे बाजूला ठेऊन बाजार समितीचे माजी सभापती डॉ सतेंद्र भुसारी,रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील ,शेतकरी नेते विनायक सरनाईक भाजपा नेते गजानन तुकाराम भुसारी,प्रताप ढोरे ,सरपंच पती विकास गवई,उपसरपंच शेख अल्ताफ,भाजपा नेते रमेश आकाळ,भाजपा तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील,ग्रा पं सदस्य विष्णू मुरकुटे,भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दिपक मुरकुटे सर भोरसा भोरसी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बद्री भुसारी ,एन टी भुसारी,गोपाल ढोरे पजांबराव भुसारी,रामेश्वर मुरकुटे, साहेबराव मुरकुटे, पाटील,संदीप ढोरे पाटील,शेख बाबू ,दत्ता आष्टीकर,राजेश गवई बाबुराव गवई,आदींनी ठराव अविरोध मंजुरी साठी प्रयत्न केले.                  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या