💥पुर्णा शहरातील अंबिका नगरातील डॉ.राहुल पाटील प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्र बनले सर्वसामान्यांच्या पोटाला आधार...!


💥 शिवभोजन केंद्रास गरीब गरजु नागरिकांसह सर्वसामान्यांचा उत्फ्सुर्त प्रतिसाद💥

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतुन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून साकारलेले असंख्य शिवभोजन थाळी केंद्र राज्यभर सुरु करण्यात आले असुन गरीब व गरजुंना मोफत पोटभर जेवण मिळावे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 


परभणी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या प्रयत्नांनी पुर्णा शहरातील डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणला या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरीब व गरजुंची सेवा करण्याची संधी दिली पुर्णा शहरातील अंबिका मंदीर रोड नवा मोंढा परिसरातील डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्र गेल्या महिन्यात १५ आँगस्ट रोजी सुरु करण्यात आले दररोज १०० शिवभोजन थाळी व कोरोनाचा दिडपट वाढीव इष्टांक ५० असे मिळुन १५० लोकांना रोज शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात पुर्णा शहर व  तालुक्यातील जवळपास ४००० लोकांनी या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असुन नवा मोंढ्यातील मापाडी कामगार, हमाल, शेतकरी, शेतमजुर, प्रामुख्याने सातत्याने या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेत आहेत. 


अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकारणी सुध्दा स्वतःसह कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून अन्नदानाची सेवा कार्य बजावत असल्याने शहरातील डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलीत शिवभोजन थाळी केंद्र सर्वसामान्यांच्या पोटाला एक खंबीर आधार म्हणून नावारूपाला येत असून या मोफत शिवभोजन थाळीत वाढदिवसाचे औचित्य साधुन शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अनिल चितलांगे यांनी बालुशाई,सामाजिक कार्यकर्ते राजु माने यांनी मोतीचुर लाडु व चि.राम बजरंग रोडे (जिलेबी) यांनी एक गोड पदार्थ देत गरीब व गरजुंच्या मुखी एक घास भरवत आदर्श वाढदिवस साजरा करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला.

💥पुर्णेत पर जिल्ह्यातून नीट परिक्षेसाठी आलेल्या असंख्य विद्यार्थी-पालकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद💥


रविवार १२ सप्टेंबर रोजी पुर्णा येथे प्रथमच श्री.गुरुबुध्दीस्वामी महाविद्यालयात नीट परिक्षा - २०२१ परिक्षा घेण्यात आली. नांदेड, हिंगोली, वाशिम,अमरावती, जालना, लातुर जिल्ह्यातुन परिक्षार्थी व पालक नीट परिक्षे निमित्य आले असता त्यांनी डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्रात मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला व शिवभोजन थाळी या योजनेबद्दल  समाधान व्यक्त केले. 


शहरातील अंबिका मंदीर रोड,नवा मोंढा भागात मापाडी कामगार, हमाल, शेतकरी,शेतमजुर, ग्रामीण भागातील विविध कामातील शहरात येणारे सर्वसामान्य नागरीकांनी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शिवभोजन थाळीची संख्या कमी पडत असुन लवकरच शिवभोजन थाळींची संख्या वाढविण्यासाठी परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्राचे संचालक मोहन वसंतराव गुंजकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या