💥तामिळनाडू पोलिसांना तब्बल २३ वर्षांनी एका आरोपीला अटक करण्यात यश...!


💥अन् तब्बल २३ वर्षांनी सापडला फरार आरोपी नाव बदलून सुरक्षारक्षक म्हणून करत होता काम💥

 तामिळनाडू पोलिसांना तब्बल २३ वर्षांनी एका आरोपीला अटक करण्यात यश आलंय १९९२ मध्ये केलेल्या एका गुन्ह्यासाठी तिरूनेलवेली मे.जिल्हा सत्र न्यायालयाने पाचथू नावाच्या आरोपीला १९९५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मात्र, १९९८ मध्ये तो तुरुंगातून पळून गेला आणि केरळच्या एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करू लागला अंबासमुद्रमचे पोलीस निरीक्षक चंद्र मोहन यांच्या टीमने पाचथूला अटक केली आहे. 

आरोपी हा तिरुनेलवेली जिल्ह्यातील गौतमपुरीचा रहिवासी होता आणि केरळच्या थोडुपुळा भागात सुरक्षा रक्षकाचं काम करत होता ७२ वर्षीय पाचथू नावाच्या या आरोपीला १९९२ मध्ये हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आरोप सिद्ध झाल्यानंतर तिरुनेलवेली मे.जिल्हा न्यायालयाने १९९५ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली मात्र त्याने या शिक्षेविरोधात मे.मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु, मे.उच्च न्यायालयानेही त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली हे कळताच पाचथू फरार झाला. 

मे.कोर्टाने १९९८ मध्ये त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले तेव्हापासून त्याला अटक करण्यात आली नव्हती डी.एस.पी. मनिवन्नन यांच्या आदेशानुसार अंबासमुद्रम डी.एस.पी. फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखालील विशेष टीमने पाचथूचा शोध सुरू केला याच दरम्यान अंबासमुद्रमचे पोलीस निरीक्षक चंद्र मोहन यांनी पाचाथूच्या काही नातेवाईकांची चौकशी केली असता तो मोबाईलद्वारे आपल्या पत्नीच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांना मिळाली १५ ऑगस्टपासून पोलीस त्याचा फोन ट्रॅक करत होते त्यानंतर पोलीस त्याच्या तामिळनाडूतील घरी पोहोचले आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या