💥परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी ; परभणीकरांच्या जिव्हाळ्याच्या मागणीची गांभीर्याने दखल...!


💥औरंगाबाद येथील ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमातून मंजूरीबाबत घोषणाही झाल्याचे समजते💥

परभणी : (दि.१७ सप्टेंबर) परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आंदोलनाला अखेर यश आल्याचे दिसत असून परभणी वासियांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीस काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा जिल्ह्याचे सक्षम व खंबीर नेतृत्व सुरेशराव वरपुडकर यांनी पाठींबा दर्शवत आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज शुक्रवार दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथील ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमातून मंजूरीबाबत घोषणाही झाल्याचे समजते.


परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करावे यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह यांच्यासह सर्वपक्षीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांसह 'आम्ही परभणीकर' या आंदोलनातील प्रतिष्ठित नागरिकांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परभणीत जोरदार आंदोलनास सुरूवात केली होती या आंदोलनात माजी राज्यमंत्री तथा पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशराव वरपुडकर यांनी सक्रीय सहभाग नोंदवून जोरदार सुत्र हलवल्यानंतर व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह सत्ताधारी शिवसेना लोकप्रतिनिधी खा.संजय जाधव यांनी पक्षश्रेष्ठीबरोबर चर्चा केली. परभणीकर संघर्ष समितीनेही मुंबई विविध पातळीवर या विषयाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला होता अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परभणीकरांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असल्याची माहिती हाती आहे.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याच्या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्य केला.मराठवाडा मुक्ती दिना निमित्य आज औरंगाबाद येथील ध्वंजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे या विषयी मंजूरीची घोषणा करील व राज्य मंत्रीमंडळात प्रस्ताव आणूण त्यास मंजूरी बहाल करील असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ महानगरपालिका अंतर्गत भूमिगत गटार योजनेच्या कामास सुद्धा मंजुरी बहाल करीत अशीही चिन्हे आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या