💥पुर्णा ; गौर ग्रामपंचायतचा अजब कारभार ; अंडरग्राऊंड नाली बांधकामाच्या नावावर विकासनिधीच केला 'अंडरग्राऊंड'...!


💥अंडरग्राऊंड नाल्यांचे बोगस काम झाल्याचे अल्पावधीत झाले उघड💥


पुर्णा ; तालुक्यातील गौर गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे गावातील विकासाची संपूर्णतः वाट लागल्याचे निदर्शनास येत असून लाखों रुपयांचा शासकीय विकासनिधी अत्यंत थातुरमातूर निकृष्ट दर्जाची बोगस विकासकाम करून घशात घातल्या गेल्यामुळे गावातील दर्जाहीन झालेली विकासकाम आता हळुवारपणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची स्वतः प्रत्यक्षात साक्ष देवू लागली आहेत.

गौर ग्रामपंचायत प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून गावात अवघ्या काही महिण्यांपुर्वीच अंडरग्राऊंड नाल्यांची बांधकाय करण्यात आली असून सदरील नाल्यांची बांधकाम अत्यंत दर्जाहीन व निकृष्ट दर्जाची झाली असल्याने या अंडरग्राऊंड नाल्यांवरील स्लाप अक्षरशः फुटून आतील घान बाहेर येत असल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची दुर्गंधी सर्वत्र पसरत असतांना मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह पंचायत समिती/जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या भ्रष्ट कारभाराच्या दुर्गंधीकडे का लक्ष जात नसेल ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या भ्रष्ट कारभाराच्या पसरत चाललेल्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही संधी साधली की काय ? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे.


गौर गावातील लोकसंख्या अंदाजे चार ते साडेचार हजार इतकी असून सदरील गावाच्या विकासासाठी शासनाने प्रचंड प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही गावातील सार्वजनिक रस्त्यांचा,सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा,सार्वजनिक स्वच्छता गृहांचा,पथदिव्यांचा,गावातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाला असून गावातील वनशहीद सदाशिवअप्पा नागठाणे यांच्या नावावर गावातील स्वागत कमान व मुख्य रस्त्याच्या बांधकामासाठी आलेल्या लाखो रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सुध्दा अत्यंत निकृष्ट व दर्जाहीत कामे करून अक्षरशः विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास येत असून गावात जाण्यापुर्वी उभारण्यात आलेली वनशहीद स्व.सदाशिवअप्पा नागठाणे यांच्या नावाची स्वागत कमान वाहनांच्या हादऱ्याने वारे वावदानाने अक्षरशः झुलतांना पाहावयास दिसत असून सदरील स्वागत कमान केव्हा कोलमडून पडेल सांगता येत नाही.

गौर गावात अवघ्या काही महिण्यांपुर्वीच सरपंच पारवे यांनी लाखो रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून गावातील अंडरग्राऊंड नाल्यांची बांधकाम केली खरी परंतु सदरील अंडरग्राऊंड नाल्यांची बांधकाम अत्यंत अल्पकालावधीतच उध्वस्त होत असल्यामुळे सरपंच पारवे यांनी 'विकासाच्या नावावरील चालवलेली भुलभुलैया' पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून सरपंच महोदयांनी अंडरग्राऊंड नाली बांधकामाच्या नावावर विकासनिधीच 'अंडरग्राऊंड' केल्याचे स्पष्ट दिसत आहे........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या