💥आमदार अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यासमवेत साजरा केला बैलपोळा सण....!


💥आ.दानवेंनी चिकलठाणा व परिसरातील शेतकऱ्यांच्या समवेत पारंपारीक पध्दतीने बैलपोळा सण साजरा केला💥

  ✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद :  शेतातील राब राब राबणाऱ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाचा सखा, सर्जाराजा, खरा साथीदार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे "बैलपोळा" शिवसेना प्रवक्ते , जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज चिकलठाणा व परिसरातील शेतकऱ्यांच्या समवेत पारंपारीक पध्दतीने  बैलपोळा सण साजरा केला. यावेळी बैल जोडीचे पूजन, औक्षण करून त्यांना आजच्या ह्या मंगलदिनी पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला व गावात मिरवणूक काढण्यात आली.


यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या तसेच देशावर व राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे सर्वांनाच सुख-समृद्धी धनसंपत्ती ऐश्वर्य आनंदी जीवन लाभू दे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली व या आधुनिक काळातही शेतकऱ्यांचे बैलाप्रती नांत असंच स्नेहांकीत होत राहो अशी  अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख  बाबासाहेब डांगे, उपशहरप्रमुख रमेश दहीहंडे, विभागप्रमुख  सोमनाथ नवपुते ,सारंगधर सोत्रे, रमेश लोंढे,रामेश्वर कोरडे,बाबासाहेब लोंढे, दिनेश गाजरे, संतोष जाधव, शिवसेना व्यापारी आघाडी उपशहरप्रमुख संजय कोरडे,राजु डोळस, श्रीकांत लोंढे, संजय जगधने, सचिन कदम, आकाश रीठे,विकी रिठे, बाबासाहेब सूर्यभान लोंढे, संतोष लोंढे आदी उपस्थित होते...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या