💥मंगरूळपीर नगर परिषदेत रुजु होताच मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी केली विकासकामाला सुरुवात....!


💥प्रलंबित कामांचा आढावा घेवून लगेच विकासकामाला प्राधान्य देत फील्डवर जावून साधले जनतेशी हितगुज💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर येथील नगरपरिषदेला मुख्याधिकारी दिपक इंगोले हे रुजु होताच ॲक्शन मोडवर आले असुन विविध विभागाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेवून लगेच विकासकामाला प्राधान्य देत फिल्डवर जावून जनतेशी हितगुज साधत समस्या जाणून घेवुन 'प्रशासन सामान्य माणसाच्या हितासाठीच'याचा विश्वास शहरवाशीयांना देवून धडाकेबाज पध्दतीने कामाला सुरुवात करुन शहरवाशीयांच्या मनात जागा मिळवायला सुरुवात केली आहे.


गेल्या दिड महीन्यापासुन मंगरुळपीर नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला होता.आतापर्यत प्रभारीच्याच खांद्यावर न.प.ची धुरा असल्याने सर्व आलबेल होते.परंतु एवढ्या प्रतिक्षेनंतर मंगरुळपीरला कायम मुख्याधिकारी मिळाले आणी तेही रुजु होताच कामाला सुरुवात करणारे.मुख्याधिकारी दिपक इंगोले हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.राजकारण्यांशी चार हात दुर राहुन किंवा राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता लोकहिताचे आणी प्रशासकीय चौकटीत राहुन काम करण्याची सचोटी असणारे मुख्याधिकारी मोरे सर्वपरिचित आहेत.मंगरूळपीर येथे रुजु होताच त्यांनी कामाची चुणुक दाखवुन जुन्या न.प.च्या ईमारतीभोवती अतीक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर घेवून स्पाॅट पाहणी केली.शहरवाशीयांशी हितगुज करुन समस्या जाणून घेतल्या.विविध कामांचा आढावा घेत कामाला सुरुवात केली.तसे पाहता मंगरूळपीर शहर विविध समस्यांनी ग्रासले आहे.आतापर्यत लोकप्रतिनीधी आणी प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहर विकासापासुन कोसो दुर राहीले.अशा स्थीतीत काटेरी मुकुट असलेल्या खुर्चीची धुरा मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्या हाती आल्याने शहरवाशीयांना मोठा दिलासा मीळाला.आपल्या शहराचा कायापालट होवुन मंगरुळपीर हे माॅडेल सिटी म्हणून नावलौकीक जरुर मीळवेल असा आत्मविश्वास आता जनता व्यक्त करत आहेत.मुख्याधिकारी यांची काम करण्याची शैली ही वेगळी असुन सर्वांना सन्मानाची वागणूक देवून हितगुज करुन सामान्यांच्या समस्या जावून घेवून विकासात्मकदृष्ट्या शहराचे हित जोपासणारे असल्याने शहरवाशीयांनी या अधिकार्‍यांचे कौतुक केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या