💥पुज्य भन्ते पय्यावंशजी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांची ग्रंथ वाचनास भेट......!


💥यावेळी पुज्य भन्ते पय्यावंशजी यांचे प्रवचन झाले💥

पुर्णा (दि.२८ सप्टेंबर) येथील बुद्ध विहारात काल सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी पुज्य भन्ते पय्यावंशजी,भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे साहेब,शामराव जोगदंड,बाबाराव वाघमारे,समता सैनिक दलाचे राहुल कचरे,शहर अध्यक्ष तथा बौध्दाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी" पंचशील बुद्ध विहार पुर्णा या ठिकाणी "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथ वाचनास भेट दिली नियमित ग्रंथ वाचनानंतर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व पुज्य भन्ते पय्यावंशजी यांचे प्रवचन झाले.

या सर्वांचे भव्य स्वागत पंचशील नगर येथील आम्रपाली महीला मंडळच्या अध्यक्षा आशाताई भोजराज कसबे व नगरसेवक विरेश कसबे यांच्या वतीने करण्यात आले भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ग्रंथ वाचक बौध्दाचार्य उमेश बाऱ्हाटे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले ग्रंथ वाचनास मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या