💥जिंतूरच्या पत्रकार मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा....!


💥पत्रकार संघाची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी💥 

जिंतूर - येथील पत्रकार मोहम्मद एजाज यांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिस प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा, अशी मागणी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

               जिंतूर येथील पत्रकार मोहम्मद एजाज यांना इनामी जमिनी च्या बातम्या प्रकाशित करण्याच्या कारणावरून तहसील कार्यालयात मारहाण करण्यात आली होती. या घटनेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. जिंतूरच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने यापूर्वी तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला होता तसेच याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु या प्रकरणात अजूनही अशा प्रकारचा गुन्हा दाखल न झाल्याने पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. 

              जिंतूरच्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात सदर घटनेत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपींवर कार्यवाही करावी तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, मार्गदर्शक एम ए माजिद, दीपक राजूरकर, बाबरोद्दिन सिद्दिकी, अकबर सिद्दिकी, रियाज चाऊस, आबेद देशमुख, तुकाराम सर्जे, सय्यद अकिल, सय्यद रियाज आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

नसता आंदोलनावर ठाम ;-

सदर घटनेत पोलीस प्रशासनाने आमच्या मागणीची योग्य दखल न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितले. 

जिंतूर- येथील तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पत्रकार एम एजाज मारहाण प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी,एम ए माजिद, दीपक राजूरकर, बाबररोद्दिन सिद्दिकी, अकबर सिद्दिकी, रियाज चाऊस, आबेद देशमुख, तुकाराम सर्जे, सय्यद अकिल, रियाज कुरेशी आदी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या