💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस सर्कल मधील महातपूरी परिसरातील पिंगळगड नदी काठावरील शेती पाण्याखाली...!


💥नदीकाठच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत💥

ताडकळस ; पिंगळगड नदीच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या सारखीच पूरपरिस्थिती होती की काय अशी भीती नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर गंभीर बनला आहे पावसामुळे पिंगळगड नदी दुथडी भरून वाहत आहे हवामान खात्याने अजून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे पूर्णा तालुक्यातील महातपुरी परिसरातील जनता भयावह परिस्थिती जीवन कंठीत आहे.  शेती पाण्यात गेली तर घर पाण्याच्या उंबरठ्यावर असल्याने विदारक अवस्था या भागात निर्माण झाले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या