💥ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा विमा कंपनीस दणका...!


💥प्रकरणांमध्ये अर्जदारांना न्याय मिळून देण्यासाठी आयोगासमोर ॲड.गुणवंत नाटेकर यांनी बाजू मांडली💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली : रायपुर येथील जिल्हा परिषद शिक्षक आसाराम हनवते यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोताळा यांच्याकडून घरबांधणीसाठी गृहकर्ज घेतले होते. गृहकर्जाच्या खात्रीशीर परतफेडीसाठी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून विमा उतरविण्यात आला होता. दुर्दैवाने आसाराम हनवते यांचा सण 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर विमा कंपनीने आसाराम हनवते हे अल्कोहोलिक यकृत या आजाराने ग्रस्त असल्याचे कारण समोर करून गृहकर्जाची परतफेड नाकारली होती. 

त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने घराची जप्ती व लिलाव विक्रीसाठी यश कन्सल्टन्सी औरंगाबाद या वसुली एजन्सीची नेमणूक सुद्धा केली होती या प्रकाराने व्यथित होऊन मयत आसाराम हनवते यांच्या पत्नी शोभाताई हनवते यांनी अॅडव्होकेट गुणवंत देवराव नाटेकर यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली होती. त्यांनी दाखल केलेल्या दाव्याची दखल घेऊन आयोगाने दिनांक 4 जुलै  2019 रोजी जप्तीच्या कारवाईसाठी जैसे थै चा आदेश पारित केला होता. त्यानंतर आयोगासमोर प्रकरणाची सुनावणी होऊन दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी सुस्पष्ट आदेश पारित करीत विमा कंपनीने गृहकर्जाची रक्कम व्याजासहित भरण्याचे आदेश दिले.तसेच हनवते यांचे बँक खात्यातून जमा केलेली प्रीमियमची रक्कम 13 हजार 490 रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे ग्राह्य धरले व तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत देण्याचे सूचित केले अन्यथा देय रकमेवर  द.सा.द.शे. 8%  दराने व्याज देय राहील असे नमूद केले आहे.सदर प्रकरण आयोगाचे न्यायाधीश विश्वास ढवळे ,मा.जयश्री खांडेभराड व मा.मनिष वानखेडे यांच्या खंडपीठासमोर चालले.आदेशाचे कथन मा.मनिष वानखेडे साहेबांनी केले . प्रकरणांमध्ये अर्जदारांना न्याय मिळून देण्यासाठी आयोगासमोर अॅड. गुणवंत नाटेकर यांनी बाजू मांडली....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या