💥चिखली अर्बन बँकेचा हिरक महोत्सवी वर्षात प्रवेश....! 💥चिखली अर्बन बँकेचे ६१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण💥     

✍️ राजेंद्र काळे

बुलडाणा: स्व.भगवानदास गुप्त यांच्या संकल्पनेतून तथा चिखली परिसराला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी व शेतकरी समृध्द करण्यासाठी चिखली अर्बन बँक सुरु झाली ती तारीख, २३ सप्टेंबर १९६१. आजपासून ही बँक ६१ व्या म्हणजेच हिरक महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे.

विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक म्हणून २३ सप्टेबर १९६१ रोजी तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान स्वयंसेवकांनी एकत्र येवून चिखली अर्बन बँकेची मुहुर्तमेढ रोवली. संघ विचारसरणीनी समर्पित कार्यकर्त्यांनी बँकेच्या उभारणीसाठी अपार कष्ट केले. स्व.वसंतराव कसबेकर यांनी बँकेच्या पायाभरणीसाठी अमुल्य सहकार्य व योगदान दिले. त्यांच्या सहकार्याने माजी अध्यक्ष नारायणजी लढ्ढा, भगवानदासजी गुप्त व प्रभुलाल भाला यांच्या ध्येयनिष्ठ प्रयत्न व कष्टाने अनंत चर्तुदशीच्या मुहुर्तावर बँकेचा कार्यारंभ झाला १९६१ साली. पुढे अण्णासाहेब पानगोळे, श्रीकिसनजी व्यास, अशोकराव वैद्य यांनी या कार्यात उतरोत्तर भर घातली. मागे वळून पाहिल्यास बँकेच्या प्रगतीचा आलेख नजरेत न मावणारा.

पहिले संचालक मंडळ त्यात केशवदासजी गुरुदासनी, भास्करराव देशपांडे, केशवराव बाहेकर व गुणवंतराव दलाल यांनी २५ हजार या लहानशा भाग भांडवलावर बँकेचे कार्य सुरु केले होते. आज ते ४७ कोटीच्या वर जाउâन पोहोचले आहे. २८० सभासदांना सोबत घेऊन सेवा कार्य करतांना बँकेचे आज रोजी ४९००० सभासद झालेले आहेत. कार्यारंभ करतांना असलेल्या रु. ५३००० च्या ठेवी आज रोजी १४९९ कोटीवर पोहोचल्या असून १०३९ कोटीची कर्ज बँकेने आज रोजी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविली आहेत. विज्ञानाची कास धरत बँकेने आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये मोबाईल बँकिंग, क्यू.आर.कोड. इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच अनेक यशाची शिखरे बँकेने पादाक्रांत केलेली आहेत.

रिझर्व बँकेने जारी केलेल्या इ.एम.व्ही.डेबिट कार्ड निर्देशांनंतर चिखली अर्बन को-ऑप बँक हि पहिली नागरी बँक होती, ज्या बँकेने आपल्या ग्राहकांना हे डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले. केवळ नफा किंवा बँकेची प्रगती हे डोळ्यासमोर न ठेवता समाजकार्य  बँक विसरली नाही. यात महिला सबलीकरणाकरीता बँकेने महिला स्वयं सहाय्यता बचत गट कर्ज योजने अंतर्गत ३५०००महिलांना अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. समाज उन्नतीसाठी आर्थिक, शैक्षणिक, सहकार, अध्यात्मिक, वैद्यकीय, क्रीडा यामध्ये औलोकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा बँक आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवान्वीत करीत असते देशाचे रक्षण करतांना सीमेवर वीरमरण आलेल्या सैनिकांच्या बाबतीत बँक आपल्या परीने त्यांच्याकरिता कार्य करीत आलेली आहे. कोविड-१९ या महामारी सोबत लढत असतांना बँकेने सामाजिक जवाबदारी यामध्ये देखील जपली. परिसरातील रुग्णालय सुसज्ज असावी व सर्वांपर्यंत वैद्यकीय सेवा तत्परतेने पोहोचावी याकरिता वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना बँकेने अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून देत हातभार लावला आहे. खातेदार, ठेवीदार, कर्जदार व सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे.

विद्यमान अध्यक्ष सतीश गुप्त व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे बँकेची घोडदौड वेगाने सुरु आहे. ३१ शाखा ८ ग्राहक सुविधा केंद्रे व संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली आपली चिखली अर्बन बँक आज आपली सेवेची ६० वर्ष पूर्ण करून ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहे गुंतवणूक, एकूण व्यवसाय, निव्वळ नफा.. अशा सर्वच बाबतीत चिखली अर्बन बँक यशोशिखरावर विराजमान आहे. संगणकीकरण प्रणाली संपुर्णत: बँकेत असून अत्याधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी चिखली अर्बन बँक सदैव अग्रेसर असते, हे उल्लेखनीय. ‘ऐकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ..’ या उक्तीप्रमाणे केवळ आपण एकटेच चालून फायदा नाही तर जे काही कारणांनी थांबलेले आहेत, त्यांना चालते करण्याचा पुढाकारही चिखली अर्बनने घेतला असून रिझव्र्ह बँक त्यासाठी त्यांना सहकार्य करत आहे. खामगाव जनता कमर्शीयल बँक चिखली अर्बनने चालवायला घेतली असून, डबघाईस आलेल्या अन्य बँकांनासुध्दा हात देण्याची भूमिका सतिश गुप्त यांनी घेतली असून यशस्वीपणे करतेय चिखली अर्बन, ६१ व्या वर्षात पदार्पण... 

 ✍️   राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या