💥जनसेसेवेसाठी जिवात जीव असे पर्यंत लढतच राहणार - खासदार संजय जाधव


💥पुर्णेत खासदार संजय जाधव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न💥

पुर्णा (दि.२६ सप्टेंबर) -  वैद्यकीय महाविद्यालय होणे हे तमाम परभणीकरांचे स्वप्न होते.पुर्वी वैद्यकीय प्रवेशाचे ७०,३० जाचक नियम  रद्द करुन घेतले.त्यानंतर शासकीय महाविद्यालय परभणीत व्हावे यासाठी सर्वपक्षीय सर्वसामान्य जनतेच्या साथीने मोट बांधुन लढा उभारला.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे.परभणी करांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले यातच आनंद आहे.जनसेसेवेसाठी जिवात जीव असे पर्यंत लढतच राहणार असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी केले.


पुर्णेत शनिवार दि.२५ रोजी येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात खा.संजय जाधव यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी खा.जाधव हे नागरी सत्काराला उत्तर  देताना बोलत होते. मंचावर प्रमुख उपस्थिती भदन्त उपगुप्त महाथेरो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सत्कारमूर्ती प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख, प्रतापराव काळे, देविदासराव शिंदे, गोविंदराव दुधाटे, प्रमुख पाहुणे सभापती बालाजी राव देसाई, महीला आघाडीच्या सखुबाई लटपटे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,उपसभापती लक्ष्मणराव बोबडे, दशरथ भोसले,राम लटके, हनुमंतराव पौळ, डॉ.विनय वाघमारे, डॉ गुलाबराव इंगोले,सुधाकर खराटे, पांडुरंग पौळ, डॉ.हरिभाऊ पाटील, हभप. सोपानकाका बोबडे, भगवानराव धस, बबनराव मुळे,प्रा.गोविंदराव कदम,प्रमोद(राजु) एकलारे, प्रकाशराव क-हाळे,अमृतराज कदम,नगरसेवक उत्तम भैय्या खंदारे, अनिल खर्गखराटे,जाकीर कुरेशी, अँड हर्षवर्धन गायकवाड,श्याम कदम, नितीन बंटी कदम, दादाराव पंडित,मधुकर गायकवाड कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे व शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. 


यावेळी खा.संजय (बंडु) जाधव यांची लाडु तुला करण्यात आली.यावेळी आपल्या अभिवचनात  बोलताना भदन्त डॉ उपगुप्त म्हणाले की वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा खा.जाधव यांनी गोरगरीबांच्या कल्याणासाठीच उभारला होता.परभणीकर त्यांचे ऋणी आहेत.यानंतर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी उपस्थितांना हवामान विषयक अंदाज तर्क,सावधानता,पेरणी मळणी कधी केंव्हा करावी याची उपयुक्त माहिती दिली.राज्यशासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन पुरस्कार प्राप्त प्रतापराव काळे व देविदास राव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल कदम यांनी तर सुत्रसंचलन जगदीश जोगदंड यांनी केले.तर आभार नगरसेवक अँड राजेश भालेराव यांनी केले.यावेळी शहरातील व्यापारी, नागरिक, शिक्षक, डाॅक्कर यांनी विविध पक्षसंघटना यांनी खा.जाधव यांचा सत्कार केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या