💥परभणी जिल्ह्यावर लागलेला मागासले पणाचा शिक्का दूर करू या : खासदार संजय जाधव यांचे आवाहन...!


💥शहरातील मोढा परिसरात खासदार संजय जाधव यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न💥

परभणी (दि.२६ सप्टेंबर) ; परभणी जिल्ह्याची मागासलेला जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्याकरीता आपल्या सगळ्यांना पक्षभेद मतभेद विसरून एकत्रितपणे काम केल्या शिवाय पर्याय नाही असे स्पष्ट मत परभणी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी परभणी शहरातील मोंढा परिसरात आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केले मोंढ्यातील मैदानावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर हे होते. व्यासपीठावर आमदार डॉ.राहूल पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, उपमहापौर भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, जिल्हप्रमूख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, जयश्री खोबे, ॲड. माधुरी क्षीरसागर, जेष्ठ नेतेविजय वाकोडे,राजन क्षीरसागर, किर्तीकुमार बुरांडे अतूल सरोदे, गुलमिर खान, आदींची उपस्थिती होती. 


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन रोकडा हनुमान मंदिर संस्थान, मोठा मारुती संस्थान,जिल्हा व्यापारी महासंघ, नवा मोंढा व्यापारी महासंघ,इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच अन्य संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला खासदार जाधव म्हणाले २०१८ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा सुरु आहे. संघटना व राजकीय भूमिका मला चांगल्या प्रकारे आवगत आहे. संघर्ष करून आपण समोर आलो आहे. संघटनास्तरापासून राजकारणातील अनेक पदे उपभोगली आहेत. त्यामुळे मोठ्या अनुभवाची शिदोरी सोबत माझ्या आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जिल्हा विकासाचे आपले उत्तरदायीत्व पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय समारोपात आमदार सुरेश वरपुडकर म्हणाले, विरोधकांनी आमचे आंदोलन सुरु असतांना हिनविण्याचे काम केले. पण सर्वसामान्य लोकांची सोबत होती. हा रेटा महत्वाचा होता. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या