💥राजस्थानातील जयपूर मध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक ; ८ जणांना अटक....!


💥कोचिंग संचालक नवरत्न स्वामी हे जयपूरमधील या पेपर लीकच्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातय💥

राजस्थानातील जयपूरमध्ये नीट परीक्षा २०२१ चा पेपर लीक झाल्याचं प्रकरणं समोर आलं आहे.रविवारी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षे दरम्यान जयपूरमध्ये पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. 

जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेपर दुपारी २-०० वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लीक झाला या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात आरोपी उमेदवार धनेश्वरी यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे तर इतरांना रिमांडवर घेण्यात आलं आहे कोचिंग संचालक नवरत्न स्वामी हे जयपूरमधील या पेपर लीकच्या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीटच्या पेपर लीकचा हा व्यवहार ३५ लाख रुपयांमध्ये झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पेपर जयपूर येथील राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (R.I.E.T.) नीट परीक्षा केंद्रातून लीक झाला आहे ३८०० हून अधिक परीक्षा केंद्रे देशभरातील ३८०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. 

या वर्षी नीट परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. नीट युजी परीक्षा प्रथमच १३ भाषांमध्ये घेण्यात आली आहे पंजाबी आणि मल्याळम या भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे त्याचसोबत, पश्चिम आशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुवेतमध्ये देखील नीट परीक्षेकरिता (NEET) एक नवीन परीक्षा केंद्र उघडण्यात आलं आहे. 

एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा नीट परीक्षा ही आता हिंदी, पंजाबी, आसामी, बंगाली, ओडिया, गुजराती, मराठी, तेलगू, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजीमध्ये घेण्यात आली आहे आपल्या माहितीसाठी, नीट परीक्षा ही याआधी १ ऑगस्ट रोजी होणार होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या