💥गौरीगणपतीच्या ऊत्सवात अंतराळाची आगळीवेगळी प्रतिकृती....!


💥पांडुरंगाने अंतराळात स्थापन केले गौरी गणपती💥

फुलचंद भगत

वाशिम: गणपती बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील साईनगर मधील रहिवासी पांडुरंग बेद्रे हे दरवर्षी गौरीची स्थापना करतात. दरवर्षी त्यांच्या संकल्पनेतून विविध देखावे तयार करुन त्यामध्ये गौराईची स्थापना करतात. यंदा मात्र त्यांनी आगळ्या वेगळ्या गौरीची स्थापना केली होती.

           भाद्रपद महिन्याची चाहूल लागताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विविध सण साजरे होताना दिसतात. त्यातच गणपती स्थापना आणि त्यानंतरच लगेच तीन दिवसांकरता महालक्ष्मीची घरोघरी स्थापना केली जाते. अस म्हणतात की, महालक्ष्मी आपल्या माहेरी तीन दिवस राहण्याकरता येत असतात. माहेरी आलेल्या महालक्ष्मीचे मोठ्या थाटात स्वागत करत त्यांची मकरांमध्ये स्थापना केली जाते. यातच प्रत्येक घरी विविध प्रकारचे देखावे केले जातात. शेलूबाजार येथील पांडुरंग बेंद्रे आणि जयश्री बेंद्रे हे दांपत्य दरवर्षी विविध प्रकारचे देखावे तयार करून त्यावर महालक्ष्मीची स्थापना करतात यापूर्वी त्यांनी शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबाव्यात यावर आधारित देखावा तयार करून महालक्ष्मीची स्थापना केली होती.यावर्षी त्यांनी चक्क अतराळाचा सुंदर असा देखावा तयार करुन गौरीची स्थापना मोठ्या थाटात केली होती. गेल्या ८ दिवसांपासून ते स्वत: आणि त्यांची पत्नी जयश्री यांनी परिश्रम घेवून सुंदर असा देखावा तयार करुन गौरीची स्थापना केली. यात त्यांनी अवकाशातील सूर्य, चंद्र आणि सर्व ग्रहाची प्रतिकृती पांडुरंग बेंद्रे आणि जयश्री बेंद्रे या दांपत्यांनी त्यांच्या हाताने रेखाटली. त्यांनी कापड, रंग, बलून, प्लास्टिक, कापूस यांच्या साह्याने अंतराळातील संपूर्ण ग्रहाची निर्मिती केली आहे. अंतराळातील देखाव्यात महालक्ष्मीची मोठ्या थाटात स्थापना करण्यात आली आहे. मनाला आकर्षून घेणारा हा देखावा परिसरातील भावि -भक्तांना जणू काही आपण अंतराळात गेलो आहोत याची प्रचिती देऊन जात आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत होती.मंगळवारी या ऊत्सवाची सांगता झाली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या