💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या....!


💥दिवाळीपर्यंत पुराव्यांसह महाविकास आघाडीमधील मंत्र्यांचे सर्व घोटाळे सिद्ध करू - किरीट सोमय्या

 ✍️ मोहन चौकेकर

▪️ बेळगाव महापालिकेवर कमळ फुललं, भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव. भाजपने ३५, काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एमआयएम एक उमेदवार विजयी. 

▪️ गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा, नियमांत कार्यक्रम करू शकता, मात्र आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आवाहन.

▪️ कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोविड टेस्ट सक्तीची की नाही ? नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे संभ्रम. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ, एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.

▪️कोरोना निर्बंध कायम असलेल्या 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीचा निर्णय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही नियम लागू

▪️ अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची चार तासांपासून ईडी चौकशी सुरू. अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी, याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांचा दावा

▪️ करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी, बीड जिल्हा कारागृहात रवानगी होणार. अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा,करुणा यांचीही फिर्याद

▪️ देशात 5 दिवसांनी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 219 रुग्णांचा मृत्यू. राज्यात रविवारी 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5916 रुग्ण कोरोनामुक्त.

▪️ दिवाळीपर्यंत पुराव्यांसह महाविकास आघाडीमधील मंत्र्यांचे सर्व घोटाळे सिद्ध करू.. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा. जितेंद्र आव्हाडांनी बॅग भरून बसावे.

▪️ अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरूणा भाटिया यांची तब्येत बिघडली. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

▪️ दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात 71 रुपयांची घसरण. सोने 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद. चांदीचे दर 263 रुपयांच्या उसळीसह 64,168 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या