💥नामवंत बालरोगतज्ञ तथा समाजसेवी डॉ जगदिश शिंदे मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित....!


💥राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-येथील नामवंत बालरोगतज्ञ तथा समाजसेवी डॉ जगदिश शिंदे यांना औरंगाबाद येथील आयटीसी रामाइंटर नॅशनल येथे लोकशाही न्यूज च्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रविवार २६ सप्टेबर रोजी सायंकाळी चार वाजता मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सपत्निक सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमा साठी मंत्री अब्दूल सत्तार,खा इम्तीयाज जलील,माजी मंत्री आ बबनराव लोणीकर,अतुल सावे,आ सतिष चव्हाण,माजी महापौर नंदकुमार घोडेले,माजी आ कल्यान काळे,मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील,लोकशाही न्युज चे मालक गणेश नायडू,धृमित नायडू, संपादक नरेंद्र कोटेकर,ऋषी देसाई,मनुश्री पाटील,विशाल पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी मराठवाड्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या मान्यवरांचा मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डॉ जगदिश शिंदे यांनी मागिल आठ दहा वर्षा पासून ओंकार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ४० वृद्धांना आधार दिला आहे. हा वृद्धाश्रम ते शासनाच्या कुठल्याही निधी शिवाय स्वखर्चातून चालवतात. त्याच बरोबर आत्महात्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला नियमित मदत करत असतात.शिवाय कोरोना काळात मानवत,पाथरी,सोनपेठ या ठिकाणी गरजूंना दरदिवशी अन्नदान केले.आरोग्य शिबिरे मोफत उपचार, शस्रक्रीया, असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात अशा या समाजशिल नेतृत्वाला मराठवाडारत्न पुरस्कार देऊन लोकशाही न्यूज ने सन्मानीत करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. डॉ शिंदे यांना मिळालेल्या पुरस्काराने पाथरी,मानवत, परभणी सोनपेठ सह मित्र परिवार चाहते आप्त,स्वकीय अशा सर्वां कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या