💥पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे कोव्हीड लसीकरणास प्रतिसाद.....!


💥पहिला आणि दुसरा डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ५५१ जणांना लस देण्यात आली💥

पुर्णा (दि.४ सप्टेंबर) ; तालुक्यातील माटेगाव येथे आज शनिवारी दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ५५१ जणांना लस देण्यात आली त्यानंतर दुपारी डब्ल्यू एच ओ परभणीच्या पथकाने भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला समाधान व्यक्त केले लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी समुदाय अधिकारी डॉ‌.उजमा मॅडम परिचारिका कातरे मॅडम वाघमारे मॅडम आरोग्य सेवक सचिन चव्हाण पो.पाटील  स्वामी मोतीराम बोबडे आशा स्वयंसेविका रेणुका देशपांडे मीना बोबडे अंगणवाडी सेविका गोदावरी बानकर छाया बोबडे आदिसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या