💥पुर्णेतील कर्तृत्ववान निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व मा.उनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बहुजन नेता उत्तमभैया खंदारे....!

💥परभणी रत्न उत्तमभैयांचा आज अभिष्ठचिंतन सोहळा ; जातीभेद धर्मभेदाला मुठमाती देऊन प्रत्येकाच्या मदतीला धावणारे नेतृत्व💥 

पुर्णा ; पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक 'परभणी रत्न' उत्तमभैया खंदारे यांचा आज गुरूवार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी वाढदिवस अर्थात अभिष्ठचिंत सोहळा असून या निमित्ताने या जनसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी सतत तत्पर राहणाऱ्या कर्तृत्ववान धाडसी निर्मळ मनाच्या व्यक्तीमत्वासाठी दोन शब्द लिहिण्याचा योग आला जातीभेद धर्मभेदाला मुठमाती देऊन प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मातील वंचितांच्या मदतीला धावून जाणार एकमेव व्यक्तीमत्व म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघितलं जात ते म्हणजे आमचे उत्तमभैया खंदारे..मागील अडीच दशकापासून पुर्णा नगर परिषदेत अधिराज्य गाजवणारे खंदारे कुटुंब म्हणजे अत्यंत सुशिक्षित व मनमिळावू कुटुंब उत्तमभैया यांच्या मातोश्री आदरणीय गयाबाई खंदारे यांनी सुध्दा नगर परिषदेत नगरसेविका म्हणून एक काळ गाजवलेला आहे.


भारतीय सैन्य दलात काही काळ कर्तव्य बजावून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलेल्या उत्तमभैया खंदारे यांना देशासह समाजाप्रती अत्यंत आदर असून गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात वेळोवेळी धावून जाणारा लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पुर्णेच्या राजकीय क्षेत्रात नावलौकिक केले आहे आज १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यास प्रत्येक धर्मातील प्रत्येक समाजातील लोकांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच विविध राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावून त्यांचा गौरव केला यावेळी शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र व जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवाराच्या वतीने पुर्णा तालुका युवक काँग्रेसचे उप तालुकाध्यक्ष चौधरी अजित,चंद्रशेखर उर्फ बाळा गवळी,अतीष लोंढे,अक्षय पद्मगीरवार आदींनी भैयांना 'कोरोना संघर्ष योध्दा' पुष्पहार शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला...

 💥उत्तमभैयांनी वाढदिवसाचे औचित्य साधून 'शिवभोजन केंद्रा' मार्फत गोरगरीब गरजवंताच्या मुखात भरवला 'गोडघास' ;-


पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मा.श्री.उत्तम भैय्या खंदारे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज गुरूवार दि.१६ सप्टेंबर रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेल्या अंबिका नगर परिसरातील डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्र येथे मोफत शिवभोजन थाळीत त्यांच्या वतिने मोतीचुर लाडुची मेजवानी देऊन गोरगरीब गरजवंतांच्या मुखात 'गोडघास' भरवून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने भैयांच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवभोजन केंद्राचे संचालक मोहन गुंजकर यांच्या वतीने शिवभोजन केंद्रात उत्तमभैयांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मुन्ना राठोड,विश्वनाथ होळकर, सचिन पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होतो..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या