💥परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शहिद भगतसिंघ जयंती साजरी...!


💥जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी शहिद भगतसिंघ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन💥

परभणी ; येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात आज सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी थोर क्रांतीकारी शहिद सरदार भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी शहीद सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या