💥नांदेड जिल्ह्यातील मुदखेड-उमरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शिवनगाव येथे मालगाडीचे डबे पटरीवरून घसरले...!


💥दुपारच्या सुमारास काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प ; मुंबई-सिकंद्राबाद देवगिरी ३ तास थांबवण्यात आली💥


नांदेड (दि.२३ सप्टेंबर) - जिल्ह्यातील मुदखेड-उमरी रेल्वे स्थानका दरम्यान शिवनगाव रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना आज गुरूवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास घडली.दरम्यान दुपारच्या  वेळी साधारण १२ : ०० ते ०१ : ०० वाजे पर्यंत रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरुवात होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून गाडी क्रमांक ०७०५७ मुंबई सिकंदराबाद ही एक्सप्रेस प्रवासी रेल्वे गाडी तब्बल ३ तास थांबविण्यात येऊन ताशी १-३ किमी वेगाने सिकंदराबाद कडे सोडण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या