💥पाथरी तालूक्यातील देवनांद्रातील सर्व नादुरुस्त चारी कामास मंजूरी द्यावी सभापती टेंगसे यांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे...!


💥अशी मागणी शुक्रवार २४ सप्टेबर रोजी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे माजी सभापती टेंगसेंनी केली💥

पाथरी / प्रतिनिधी

पाथरी तालूक्यातील देवनांद्रा सर्कल अंतर्गत येणाऱ्या अनेक गाव शिवारातील जायकवाडी कालव्यावरील पुलांची कामे अनेक वर्षा पासुन झालेली नसल्याने हे पुल व त्यावरील सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून उभारण्यात आलेली कठडेही जिर्ण होऊन तुटल्याने हे पुल रहदारीसाठी पुर्णतः धोकादायक झाले आहेत. त्याच बरोबर चाऱ्यांची ही दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन दरवर्षी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व पुलांसह नादुरुस्त चारी कामांना मंजूरी देऊन निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शुक्रवार २४ सप्टेबर रोजी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी केली.

     तालूक्यातील देवनांदरा जिल्हा परिषद सर्कल मधील देवेगाव, पोहेटाकळी, सिमुरगव्हाण, झरी व पाथरी तालुक्यातील इतर काही ठिकाणी जायकवाडीच्या कालव्यावरील पूल हे जिर्ण झाल्याने मोडकळीस आलेले आहेत. त्याच बरोबर पदचारी व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पुलावरील उभारण्यात आलेले कठडेही पूर्णतः जिर्ण होऊन तुटले आहेत. त्यामुळे यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. अनेक वेळा रात्रीच्या वेळी पुलावरील कठडे तुटल्याने छोट्या मोठया अपघाताच्या घटनाही घड़त असल्याचे या भागातील ग्रामस्थ सांगतात. सदरील पुलांवरून दैनदीन मोठ्या प्रमाणावर रहदारी असणाऱ्या  या सर्व पुलांचे वेळीच काम होणे अत्यंत अवश्यक आहे. अन्यथा या ठिकाणी एखादया मोठया अपघाताची घटना नाकाराता येणार नाही. त्यामुळे जायकवाडी कालव्यावरील जिर्ण झालेली सर्व पुल,त्यावरील कठडे व नादुरुस्त चारीचे काम पूर्ण करण्यासाठी या कामांना मंजुरी देण्यात येऊन यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील हे शुक्रवार २४ सप्टेबर रोजी पाथरी दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे केली की, पुलांचे काम लवकरात लवकर झाले तर शेतकरी बांधवांना नव्याने झालेल्या पुलावरून बैलगाडी सह अन्य वाहणे घेऊन जातांना कसरत करावी लागणार नाही व भविष्यात होणारे अपघातही टळतील पुला बरोबरच ड्रेनेज व चारी दुरुस्तीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान होणार नाही यासाठी चारी दुरुस्ती अत्यंत अवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी या कामांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या