💥ट्रेनला ठराविक वेळेत ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असणार...!


💥प्रवाश्यांना द्यावी लागणार ; मे.सुप्रीम कोर्टाचा महत्वपुर्ण निर्णय💥

 लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होणं हे नित्याचंच झालं आहे यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो त्याचबरोबर ठरलेलं नियोजन विस्कटतं मात्र आता ट्रेनला ठराविक वेळेत ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल असा निर्णय मे.सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

 सार्वजनिक वाहतुकीला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल तर त्याला व्यवस्था आणि कार्यशैली सुधारणं आवश्यक आहे असं मत मे.सुप्रीम कोर्टानं नोंदवलं तसेच प्रवाशाला ३० हजार रुपये भरपाई देण्यास सांगितलं आहे ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी सोडू शकत नाही रेल्वे प्रवाशांना विलंबाचं कारण कळवण्यात अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल असा निकाल न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिला आहे. 


प्रवाशांचा वेळ अमूल्य आहे आणि उशीर झाल्यास कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल सार्वजनिक वाहतूक सेवेला आपलं कामकाज सुधारणं आवश्यक आहे देशातील जनता, प्रवाशी सरकारच्या दयेवर अवलंबून राहू शकत नाहीत याची जबाबदारी कुणाला तरी घ्यायला हवी असं मत देखील मे.सुप्रीम कोर्टातील खंडपीठानं नोंदवलं या प्रकरणानंतर मे.सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय संजय शुक्ला ११ जून २०१६ रोजी अजमेर-जम्मू एक्स्प्रेसने आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते ही ट्रेन सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती.मात्र ट्रेन १२ वाजता नियोजित ठिकाणी पोहोचली त्यामुळे १२ वाजता जम्मू विमानतळावरून सुटणारं विमान निघून गेलं कुटुंबाला जम्मू ते श्रीनगर असा प्रवास टॅक्सीने करावा लागला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या