💥संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार दरवर्षी सुमारे २० लाख लोकांचा कामाच्या ताणामुळे मृत्यू...!

 


💥वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार समोर आकडेवारी💥

संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार दरवर्षी सुमारे २० लाख लोक कामाशी संबंधित कारणांमुळे मरण पावतात ज्यात दीर्घ कामाचे तास आणि वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांचा समावेश आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार २०१६ मध्ये १० लाखाहून अधिक लोकांच्या मृत्यूला कामाशी संबंधित ताण आणि आजार कारणीभूत आहेत. 

“हा अहवाल लोकांना जागं करणारा असेल अशी आशा बाळगून डब्ल्यू.एच.ओ.चे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले “इतक्या लोकांना त्यांच्या नोकऱ्यांमुळे अक्षरशः मरताना पाहणे धक्कादायक आहे या अभ्यासात १९ व्यावसायिक जोखीम घटकांचा विचार केला आहे ज्यात दीर्घ कामकाजाचे तास, कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण, दमा, कार्सिनोजेन्स आणि आवाजाचा समावेश आहे. 


त्यात असे दिसून आले की कामाशी संबंधित मृत्यूंची संख्या असमान प्रमाणात आग्नेय आशिया आणि पश्चिम पॅसिफिकमधील कामगारांमध्ये, पुरुषांमध्ये आणि ५४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आहे. दीर्घ काळ काम करण्यामुळे झालेल्या हृदयरोगाचा परिणाम म्हणून वर्षाला अंदाजे 745,000 लोक मृत्यूमुखी पडत होते.


या जागतिक आरोग्य संघटनेच्या जुन्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हा नवा अभ्यास करण्यात आला आहे प्रकाशित झालेल्या व्यापक अहवालात असे आढळून आले की कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषणही जीवघेणं ठरत आहे २०१६ मध्ये वायू प्रदूषणामुळे ४ लाख ५० हजार जण मृत्यूमुखी पडले तर दुखापतीमुळे तीन लाख ६० हजार लोक मारले गेले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या