💥संस्कार प्राथमिक शाळेत शहीद भगतसिहं यांची जयंती साजरी....!


💥कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनकाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला💥    

संस्कार प्राथमिक शाळेत क्रांतिकारक ज्यांनी आपल्या चोविसाव्य वर्षी आपल्या मृत्यूला  हसत मुखाने कवटाळले आणि समोर मृत्यू दिसत असताना ही इन्कलाब जिंदाबाद चे नारे दिले अश्या थोर आणि वीर भगतसिह यांची जयंती आज शाळेत करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे साचीव श्री दिपक तांदळे सर तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकाडे सर व पर्यवेक्षक श्री इंगळे सर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे श्री दिपक तांदळे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला.व त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.एवढे बोलून त्यांनी आपली जागा घेतली नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनकाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंडले सर तर आभार श्री आनकाडे मारुती सर यांनी मांडले या वेळी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्तिथी होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या