💥परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली पुर्णेतील खाजगी समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट...!


💥समर्थ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.संजय लोलगे व डॉ.सौ.ज्योती लोलगेंनी केला जिल्हाधिकारी गोयल यांचा सत्कार💥

परभणी ; परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज बुधवार दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या पुर्णेतील दौऱ्या दरम्यान येथील पुर्णा-पांगरा रस्त्यावरील खाजगी समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीची पाहणी केली. 

यावेळी समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पुर्णा सहकारी कारखान्याचे संचालक डॉ.संजय लोलगे व डॉ.सौ.ज्योती लोलगे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचा सत्कार केला यावेळी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा सोशियल मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे,माजी नगरसेवक प्रविण अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या